28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeTech Newsफ्लिपकार्ट मोबाईल बोनांझा सेल

फ्लिपकार्ट मोबाईल बोनांझा सेल

ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर आजपासून मोबाईल बोनांझा सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोनवर भरघोस डीस्काउंट आणि सूट देण्यात आली आहे. याशिवाय या हँडसेटवर बर्‍याच चांगल्या ऑफरही उपलब्ध आहेत. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये Apple, Asus, Realme यासारख्या मोठ्या ब्रँडचे स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

फ्लिपकार्ट मोबाईल बोनांझा सेल मध्ये स्मार्टफोन नो कॉस्ट ईएमआयच्या पर्यायासह खरेदी करता येईल. तसेच एक्सचेंज ऑफरचा फायदाही यूजर्सना देण्यात येत आहे. एवढेच नाही तर फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदीवर तुम्हाला दोन हजार रुपयांपर्यंतचे कॅशबॅकही मिळेल. फ्लिपकार्टच्या मोबाईल बोनांझा सेल मध्ये iPhone SE वर 3,000 रुपयांची सूट मिळत आहे. येथे आपल्याला या फोनसाठी केवळ 29,999 रुपये द्यावे लागतील. तसेच लोकप्रिय गेमिंग फोन Asus Rog Phone 3 वर या सेलमध्ये 5000 रुपयांची सूट दिली जात आहे. सूट मिळाल्यानंतर 46,999 रुपये असलेल्या या फोनची किंमत 41,999 रुपये झाली आहे. याखेरीज लेटेस्ट Real me Narzo 30 Pro वर एक हजार रुपयांची सूट मिळत आहे. तसेच, जर तुम्हाला मोटो जी 10 पॉवर घ्यायचा असेल तर हा फोन 9,499 रुपयामध्ये उपलब्ध आहे.

आयफोन 12 मिनी – या जबरदस्त फीचर्स असलेल्या आयफोनला या सेलमध्ये तुम्ही ६९ हजार ९९० रुपयाऐवजी ५९ हजार ९९० रुपयात खरेदी करू शकता. ६४ जीबी व्हेरियंटच्या आयफोनला या सेलमध्ये एक्सचेंज ऑफर अंतर्गत खरेदी केल्यास तुम्हाला १६ हजार ५०० रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो आयफोन 12 मिनीमध्ये ५.४ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले दिलेला आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या रियर कॅमेरा मध्ये १२ मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा सेटअप आणि फ्रंट कॅमेरामध्ये १२ मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा मिळतो.

Samsung Galaxy A51 – हा फोन फ्लिपकार्ट बोनांझा सेलमध्ये २० हजार ९९९ रुपयांच्या किमतीला उपलब्ध आहे. फोन एक्सचेंज ऑफर मध्ये खरेदी केल्यास १६ हजार ५०० रुपयां पर्यंत जादा डिस्काउंट मिळू शकतो. या फोनमध्ये ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल जादा स्टोरेज क्षमता आहे. तसेच ३५०० रुपयांच्या सुरुवातीला नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करू शकतो. फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. रियरमध्ये ४८ मेगा पिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप आणि ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे. अजूनही बर्याच ब्रँडवर वेगवेगळ्या सूट दिल्या गेल्या आहेत.

- Advertisment -

Most Popular