राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३१ मे २०२१ पर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. याशिवाय १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरणालाही तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. ज्या नागरिकांनी कोरोनाची पहिली लस घेतलेली आहे. त्या नागरिकांना दुसरा डोस ठराविक कालावाधीनंतर मिळावा यासाठी १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे हे लसीकरण बंद करण्यात आले आहे. जेणेकरुन कोरोना लसीचा पहिला डोस घेतला असेल त्यांना याच लसीचा पुढचा डोस घेणे सहज उपलब्ध होईल. राज्याचे मुख्यमंत्री आज लॉकडाऊन आणि मुंबई लोकल सुरु ठेवायची कि बंद बाबतचा अंतिम निर्णय जाहीर करतील. तसेच, लॉकडाऊन बाबतची अंतीम नियमावली येत्या एक ते दोन दिवसांमध्ये जाहीर करण्यात येणार आहे. सध्या आहे त्याच नियमावलीवर काम केले जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
मागील १८-२० दिवसांपासून केल्या गेलेल्या संपूर्ण लॉकडाऊनमुळे राज्यातील कोरोना व्हायरस संसर्गाचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. त्यामुळे हा लॉकडाऊन आणखी काही दिवस पुढे वाढवण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत सर्वच मंत्र्यांनी दुमत व्यक्त केले आहे. राज्यातील लसीकरण वेगाने पार पडण्यासाठी सीरमच्या अदर पुनावाला यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाही केली आहे. त्यामध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे , आधी लसीकरण राज्याचे मग इतरांचे. त्यामुळे येत्या २० मे नंतर राज्याला कोरोना लसीचे २० लाख डोस देणार असल्याचे आश्वासन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे स्पष्ट केले आहे.
तसेच मुंबईची लाइफलाईन असलेल्या मुंबई लोकल बद्दल लॉकडाऊन काळात मुंबईमध्ये लोकल ट्रेन प्रवासामध्ये जनसामान्यांना काही सवलत मिळू शकते का? अशी प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता राजेश टोपे यांनी मुंबई लोकल आणि इतर विषयांवर मुख्यमंत्रीच निर्णय सांगतील असे सांगितले. परंतू, सध्याची तरी कोरोनाची भयानक स्थिती पाहता सर्वसामान्य जनतेसाठी मुंबई लोकलमध्ये प्रवास करायला मिळण्याची शक्यता अशक्यप्राय वाटते असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
३१ मे २०२१ पर्यंत वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊन बाबत आधीप्रमाणेच काही नियमावली जरी करण्यात आलेली आहे.
परराज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांसाठी ४८ तास आधीचा कोरोना आरटीपीसीआर रिपोर्ट अनिर्वाय आहे.
एअरपोर्ट आणि बंदरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल ट्रेन आणि मेट्रोमध्ये प्रवासाची सवलत दिली जाणार आहे.
इतर कोणत्याही राज्यातून जो कोविड हॉटस्पॉट म्हणून जाहीर केलेला असेल, तिथून महाराष्ट्रात मालवाहतूक करणाऱ्यांसाठी कोरोनाची चाचणी आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे, तसेच या अहवालाची वैध्यता ७ दिवसंसाठी ग्राह्य धरली जाणार आहे.
अवजड माल अथवा मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये केवळ २ चं माणसांना प्रवास करायला परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये एक ड्रायव्हर आणि एक क्लिनरचा समावेश असेल.
रोजच्या दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांना या कोरोन निर्बंधांतून सवलत देण्यात आली आहे.
स्थानिक स्तरावर जर बाजारपेठेमध्ये ठराविक वेळेच्या मर्यादेनंतरही गर्दी झाल्यास स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाने त्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन त्वरित कार्यवाही करायची परवानगी देण्यात आली आहे.