चीनने अवकाशात सोडलेले एक मोठं रॉकेट The Long March 5B या आठवड्यात अनियंत्रित झाल्याने कोणत्याही क्षणी पृथ्वी अथवा अमेरिकेवर आदळण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण ते नेमकं कोणत्या ठिकाणी आदळणार याची माहिती कालपरवापर्यंत मिळाली नव्हती. त्यामुळे जगभरात सर्वत्र भीतीदायक आणि प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झालं होते. असे बोलले जात होते की कदाचित हे रॉकेट यावेळेस मालदिव देशावर पडले जाईल आणि याचीच भीतीदेखील नासाने व्यक्त केली होती पण दैव बलवत्तर म्हणून हे चायना चे हे रॉकेट आणि त्याचे अवशेष भारतीय महासागरात पडले आणि कोणती हानी झाली नाही. झालेल्या प्रकाराबद्दल नासाने चीनवर ताशेरे ओढले आहेत.
स्कायलॅब घटना
अशीच काहीशी घटना १९७८ साली घडणार असल्याने यापेक्षा जास्त भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. कित्येक भारतीयांनी तर आत्ता आपला अंत जवळ असल्याचे मनाशी ठरविले होते. चीनचे हे अनियंत्रित The Long March 5B रॉकेट अनेकांना 1979 सालच्या स्कायलॅब या अमेरिकन स्पेस स्टेशनच्या अपघाताची आठवण ताजा करत आहे. स्कायलॅब हे जगात कुठेही आदळण्याची शक्यता निर्माण झाली होती, त्यामुळे संपूर्ण जगभर चिंतेच वातावरण निर्माण झाले होतं.
अमेरिकेचे हे स्पेस स्टेशन मानवी वस्तीमध्ये आदळण्याची शक्यता खूपच कमी होती. पण ते मानवी वस्तीमध्ये आदळणारच नाही असे सुद्धा शंभर टक्के खात्रीने सांगता येत नव्हतं. अमेरिकेच्या नासाने आपल्या अंतराळ कार्यक्रमासाठी स्कायलॅब नावाचे एक स्पेस स्टेशन अवकाशात उभं केलं होतं. अमेरिकेने 1973 साली स्कायलॅबसारखे जवळपास नऊ मजली उंच आणि 78 टनाचे स्टेशन अवकाशात उभारलं होतं. 1978 सालापर्यंत स्कायलॅबमध्ये काही बिघाड झाला नव्हता, अगदी सुस्थितीत काम करत होतं, पण कालांतराने सौर वादळामुळे त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान घडून आले आणि मग त्यामध्ये बिघाड निर्माण झाला. याचाचं परिणाम म्हणजे नासाचे त्यावरचं नियंत्रण सुटल्याची माहिती समोर आली. त्यामुळे हे स्पेस स्टेशन जर पृथ्वीवर आदळलं तर संपूर्ण मानवजातीचा विनाश होऊ शकतो अशा बातम्या झळकू लागल्याने सर्वत्र भीती निर्माण झाली.
NASA Administrator @SenBillNelson on debris from the Chinese Long March 5B rocket: “Spacefaring nations must minimize the risks to people and property on Earth of re-entries of space objects and maximize transparency regarding those operations."
— NASA (@NASA) May 9, 2021
More: https://t.co/YUW0cB96he pic.twitter.com/ZxSDm035vA
स्कायलॅब जर भारत किंवा अमेरिकेवर पडणार असेल तर निश्चितपणे अमेरिका ते आपल्या जमिनीवर पडू देणार नाही, ते भारतावरच पाडण्यात येईल असं बोललं जायचं. स्कायलॅब जमिनीवर पडणार हे आता निश्चितचं झाले होतं. पण आता काहीच दिवसात जग नाश पावणार हि भावना भारतातील लोकांच्या मनात घर करू लागली. त्यावेळी अनेकांनी आपल्या संपत्ती विकल्या आणि स्वत:वर खर्च करायला सुरु केली. कारण जर जगलोच नाही तर या सर्व संपत्तीचं काय करायचं असा प्रश्न उभा राहिला होता. स्कायलॅब 12 जुलै 1979 या दिवशी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार होतं. त्यामुळे या काळात संपूर्ण भारतभर हाय अलर्ट जारी केला होता. तोपर्यंत भारतीय लोक मृत्यूच्या प्रचंड मोठ्या दहशतीखाली वावरत होते. परंतु, शेवटच्या क्षणी नासाने जाहीर केले कि, स्कायलॅब हे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान हिंदी महासागरात कोसळेल. या स्पेस स्टेशनचे काही तुकडे ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमी भागात पडले परंतु, कोणतीही जीवित हानी झालेली नव्हती. या घटनेबाबत अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जिमी कार्टर यांनी ऑस्ट्रेलियाची माफी मागितली होती. अमेरिकेवर या प्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या एका स्थानिक संस्थेने 400 डॉलरचा दावा ठोकला होता, पण अमेरिकेने काही शेवटपर्यंत ही रक्कम भरली नाही.