32 C
Mumbai
Saturday, April 13, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeSports Newsपैलवान सुशील कुमारविरोधात लूक आऊट नोटीस

पैलवान सुशील कुमारविरोधात लूक आऊट नोटीस

पैलवान तसेच ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. माजी नॅशनल चॅम्पियन सागर धनखडच्या मृत्यू प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप सुशील कुमारवर करण्यात आला आहे. त्याच्या शोधासाठी दिल्ली पोलिसांची पथकं रवाना झाली आहे. परंतु तो अद्याप पोलिसांच्या हाती सापडलेला नाही. सुशील कुमार कदाचित परदेशातही पळून गेला असावा असा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. देशाच्या सर्व विमानतळांवर सुद्धा याबद्दलची माहिती पुरवीण्यात आली आहे.

देशाची राजधानी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये 4 मे रोजी पैलवानांमध्ये झालेल्या हाणामारीत माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागर धनखड मृत्यूमुखी पडला होता. त्याच्या हत्ये मध्ये सुशील कुमारचा सहभाग असल्याचा आरोप ठेवण्यात आलेला. सुशील कुमार आपल्या साथीदारांसह सागरच्या हत्येनंतर उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हरिद्वारमध्ये त्याचं अखेरचं मोबाईल लोकेशन सापडल असून, त्यानंतर मात्र त्याचा फोन बंद येत आहे. तो नेपाळमध्ये पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे.

Look out notice against wrestler Sushil Kumar

तसेच झालेल्या मारहाणीचा व्हिडीओही पोलिसांच्या हाती लागला असून, ज्या दिवशी हत्या करण्यात आली, त्याच रात्री पोलिसांनी यामध्ये सहभागी असलेला एक आरोपी प्रिन्स दलालला शताफिने अटक केलेली. त्याच्या कसून केलेल्या चौकशीनंतर पोलिसांनी उर्वरित दहा आरोपींची नावे जाणून घेऊन ओळख पटवली होती. परंतु अद्याप कोणालाचं अटक करण्यात आलेली नाही. तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी या प्रकरणात सुशील कुमारचे सासरे आणि द्रोणाचर्च पुरस्कार विजेते सतपाल सिंह तसंच मेहुणा लव सहरावत यांची अनेक तास चौकशी केली होती. पोलिसांनी सुशील कुमारच्या सासऱ्यांकडे त्याच्या लपून राहण्याच्या संभाव्य ठिकाणां बाबत विचारणा केलेली, परंतु त्यांच्याकडून कोणतीही समाधानकारक माहिती प्राप्त झालेली नाही.

वायव्य दिल्लीचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त डॉ. गुरइकबाल सिंह सिद्धू यांनी सांगितलं की, आम्ही मॉडेल टाऊन पोलीस स्टेशनमध्ये सतपाल सिंह आणि लव सहरावत यांना बोलावून चौकशी केली आहे आणि आता आम्ही सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. तपासात आम्हाला उमगल आहे कि, स्टेडियमच्या पार्किंगमध्ये पैलवान सुशील कुमार, अजय, सोनू महाल, सागर प्रिन्स दलाल आणि अमित यांच्यामध्ये कथित रित्या वाद निर्माण झाला होता. पोलिसांना या मारहाणीचा व्हिडीओ देखील सापडला आहे. व्हिडीओ मध्ये मारहाणीत सामील असलेले सर्व लोक दिसत आहेत. याशिवाय पोलिसांनी स्टेडियममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही कसून चौकशी केली असता, यामधील बहुतांश लोकांनी सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात जबाब दिला आहे.

- Advertisment -

Most Popular