सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या टी २० सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा ६ विकेंट्सनी पराभव झाला आहे. टीम इंडियाने प्रथम नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी १९५ धावांचं लक्ष ठेवले होते. या सामन्यासोबत भारताने टी २० मालिकाही जिंकली. टी २० मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाचा कर्णधार आरोन फिंच आजच्या सामन्यात खेळला नाही. त्याच्याऐवजी कर्णधार म्हणून मॅथ्यू वेडने संघाची जबाबदारी घेतली.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १९५ धावांचे लक्ष ठेवले होते. कर्णधार मॅथ्यू वेडने ३२ चेंडूमध्ये ५८ धावांची दमदार खेळी केली. त्यात १० चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. वेडने ३२ बॉलमध्ये १० चौकार आणि एका षटकारासह ५८ रन्सची खेळी केली. वॉशिंग्टन सुंदरच्या बॉलिंगवर विराट कोहलीने त्यांची सोपी कॅच सोडली मात्र त्याच बॉलवर वेड आणि स्टीव्हन स्मिथ यांच्यातील गोंधळामुळे वेड रनआऊट झाला. वेड रन आऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा रन रेट काहीसा मंदावला. स्टीव्हन स्मिथने ४६ रन्सची खेळी केली. हेन्रिक्सने २६ तर ग्लेन मॅक्सवेलने २२ रन्स केल्या. टी.नटराजनने २ विकेट्स घेतल्या. भारताकडून टी. नटराजन याने २ बळी घेतले. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने दिलेलं १९५ धावांचे आव्हान भारताने दोन चेंडू बाकी राखत पार केले. अवर्णनीय अशी खेळी करुन भारताला यश मिळवून देणाऱ्या हार्दिक पांड्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार मिळाला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीसाठी आलेल्या केएल राहुल आणि शिखर धवनने भारताची सुरुवात जबाबदारपणे केली. त्यानंतर केएल राहुल ३० धावा करुन आउट झाला. त्याच्या जागी आलेल्या विराट कोहलीने संयमाने फलंदाजी करत शिखर धवनने ५२ आणि विराट कोहलीच्या ४० धावा झाल्यानंतर बाद झाले. त्यानंतर हार्दिक पांड्याने श्रेयस अय्यरच्या मदतीने लक्ष पार केले.
भारताची धावसंख्या १९ ओव्हर नंतर १८१/४, श्रेयस अय्यर ५ चेंडूत १२ धावावर तर हार्दिक पांड्या १८ चेंडूत २८ धावांवर खेळत होता. भारताला विजयासाठी ०६ चेंडूत १४ धावांची गरज होती. हार्दिक पांड्याने धडाकेबाज खेळी करत विजयी षटकार हाणला. त्याने २२ चेंडूत ४२ धावा करताना ३ चौकार आणि २ षटकार मारले. सरते शेवटी अंतिम धावसंख्या ऑस्ट्रेलिया १९४/५ , भारत १९५/४ करत भारताने ऑस्ट्रेलियावर ६ विकेट्सनी विजय मिळविला.