शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी पहिल्यांदाच एकत्र येऊन ही निवडणूक लढवली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीने गेल्यावर्षी २०१९ साली राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर, या तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन लढवलेली ही पहिलीचं निवडणूक होती. त्यामुळे त्या अनुषंगाने निवडणुकीकडे अनेकांचे डोळे लागून होते. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाचपैकी चार जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना यश मिळाले आहे. किरण सरनाईक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांचा पराभूत करून विजयी झाले. त्यामुळे अमरावती विभागात झालेल्या प्रभावामुळे मोठ्या पक्षाला धक्का देत अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला. अमरावती विधान परिषद शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे, अपक्ष उमेदवार शेखर भोयर यांच्यात शेवटपर्यंत लढत चालली होती, मात्र यामध्ये भाजपाचे उमेदवार नितीन धांडे यांना सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
या सर्व निकालावरुन अमरावती विभागात भाजप, महाविकास आघाडीच्या नेत्यांना एका अपक्ष उमेदवाराने लढत दिल्याने सर्वत्र चर्चांना उधान आले आहे. विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपला धक्का देत वाशिम येथील रहिवासी अपक्ष उमेदवार अॅड. किरण सरनाईक यांनी बाजी मारली. मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेखर भोयर यांनी २५ व्या फेरीच्या मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे तसेच निर्णय अधिकार्यांना फेर मतमोजणीची मागणी केली आहे. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भोयर यांची मागणी फेटाळत पुन्हा मतमोजणी करण्यात येणार नसल्याचं सांगितले. शेखर भोयर यांच्या म्हणण्यानुसार भोयर यांना २५ व्या फेरीच्या शेवटी महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या प्रा. श्रीकांत देशपांडे यांच्यापेक्षा ९ मते जास्त असल्याचे निदर्शनात आले. त्यानंतर सुरु झालेल्या पुढील फेरीच्या मतमोजणी आधी भोयर यांना देशपांडे यांच्या मतांपेक्षा पेक्षा १७१ मतांनी पिछाडीवर दाखवण्यात आले. याबाबत शेखर भोयर यांनी आक्षेप घेत निर्णय अधिकार-यांकडे फेर मतमोजणीची मागणी केली. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याला नकार दिला. मात्र याविषयी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचं शेखर भोयर यांनी सुनावले.
अखेरच्या फेरीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांची मतांची संख्या १५ हजार ६०६ वर पोहोचली. या प्रक्रियेला निवडणूक आयोगाने मान्यता आली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पियुष सिंह यांनी किरण रामराव सरनाईक हे विजयी झाल्याची घोषणा केली आणि विजयाचे प्रमाणपत्र त्यांना दिले.