जगभरामध्ये कोरोना महामारीचा मोठ्या प्रमाणात प्रभाव अहायला मिळत आहे. सरकारकडून कोरोनाला थोपविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान सेंट्रल ड्रग्स स्टँडर्स कंट्रोल ऑर्गनायझेशनने स्विर्त्झलँडच्या फार्मा कंपनीच्या अँटिबॉडी कॉकटेलच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. रोश आणि रेजेनरॉन यांनी एकत्रितरित्या विकसित केलेल्या अँटिबॉडी-ड्रग कॉकटेल कॅसिरिविमॅब आणि इमदेविमॅबच्या कोरोनावर पर्याय म्हणून आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे.
रोश कंपनीने दिलेल्या एका निवेदनात म्हटलं की, भारतात कॅसिरिविमॅब आणि इमदेविमब यांना दिलेली मान्यता अमेरिका आणि युरोपियन संघ येथील आपत्कालीन वापरासाठीचा डेटा आणि युनियनमध्ये मानवी वापरासाठी औषधी उत्पादनांच्या वैज्ञानिक समितीच्या, अभिप्रायांच्या आधारे ही मान्यता देण्यात आली आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की हे कॉकटेल प्रौढ आणि लहान मुलांना ज्यांचे वय 12 वर्षेपेक्षा अधिक वयाचे आणि वजन कमीतकमी 40 किलो पर्यंत असणे गरजेचे आहे. तसेच सौम्य आणि मध्यम कोरोना लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी ते आवश्यक आहे. भारतात कोरोनाबाधितांची संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल न करण्याची गरज न भासणे तसेच आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यास रोश वचनबद्ध राहील, असे कंपनीने निवेदनात म्हटलं आहे.
केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी कोरोनाची तिसरी लाट दिवाळीच्या दरम्यान येण्याची शक्यता असल्याचा सूचक इशारा दिला आहे. तसेच त्यांनी तिसरी लाट नक्की येणार असा विश्वासाने दावाही केला आहे.विजय राघवन यांनी म्हटलं की, कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या अनेक रेकॉर्डब्रेक केसेस समोर येत आहेत. दुसऱ्या लाटेत संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची तिसरी लाट नक्की कधी येईल हे सांगता येणार नाही, पण सध्याची स्थिती पाहता ती येणार एवढ नक्की आहे. त्यामुळे येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णतः तयारीने एकत्रित येऊन सामना केला पाहिजे. शासनाने जे निर्बंध घालून दिले आहेत त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलं आहे कि, सध्य स्थिती पाहता, कोरोनाची तिसरी लाट टाळणे अशक्यप्राय गोष्ट बनली आहे.
आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या एकूण आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत सुमारे 3,82,315 नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3780 कोरोनाबाधित रुग्णांचा वैद्यकीय सेवेमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे मृत्यू झाला आहे. देशात यापूर्वी 1 मे रोजी एकूण 3689 सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू ओढावला होता. दरम्यान 3,38,439 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.