31 C
Mumbai
Saturday, April 13, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeAutomobiles & Bikesरेनोल्टची नवी इलेक्ट्रिक कार

रेनोल्टची नवी इलेक्ट्रिक कार

पेट्रोल आणि डिझेलच्या दिवसेंदिवस वाढत जाणार्या किमतींमुळे जनता आता बाईक आणि कार सुद्धा इलेक्ट्रिक पद्धतीची पसंत करत आहेत. इलेक्ट्रिक कार्सची वाढती क्रेझ बघता आता वेगवेगळ्या कंपनीही इलेक्ट्रिक कार्स बाजारात उपलब्ध करून देत आहेत. तरुणाई तर वेगळे काहीतरी कायमच शोधात असते आणि जास्त करून बाईक अथवा कारमधील वेगळेपणा शोधतच असते. यातच रेनॉल्ट कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही मेगन-ई ला पुढील वर्षी लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक एसयूव्ही कारची छोटीशी झलक दाखवली आहे. २०२० सालामध्ये कंपनीने सर्व प्रथम या कारचे कॉन्सेप्ट मॉडेलचे सादरिकरण केले होते. कंपनीने मेगन-ई चे प्रोडक्शन मॉडेल तयार केले असून, पुढील वर्षी याचे लाँचिंग करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये फ्रेंच कार निर्माता रेनॉल्ट २०२५ वर्षापर्यंत २४ नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या विचारात आहे.

Megane E car by renault complete look

कंपनीने आता मेगन-ई चा टीझर जारी केला आहे. यात कारच्या टेललाइटला दाखविण्यात आले आहे. टीझरमध्ये कारच्या बूट डोरवर मेगनचा रेनॉल्टचा नवीन ब्रँडचा लोगो दिसून येत आहे. कारमध्ये स्लिम एलईडी टेललाइट दिली गेली असून, याचे डिझाइन एकदम युनिक आणि एकदम हटके असे आहे. मेगन-ई कंपनीचे हे पहिले वाहन असून, ते सीएमएफ-ईव्ही प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. निसानची एरिया कार सुद्धा याच प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेली आहे. या मॉडेलसह रेनॉल्ट फॉक्सवॅगनच्या ID.4 ला टक्कर देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Megane E car by renault backside

Megane-e ही रेनॉल्ट कॅप्चर कारच्या आकारा प्रमाणे समानच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मिडीयावर दाखवण्यात आलेल्या शोर्ट टीझरमध्ये मेगन-ई च्या आतील डॅशबोर्ड देखील हायलाईट करून दाखवण्यात आला आहे. डॅशबोर्डमध्ये एल-आकाराची इंफोटनेमेंट सिस्टम देण्यात आली आहे. ही रेनॉल्टची पहिली कार असेल जी इंफ्टोनेमेंट सिस्टमध्ये गुगलची सेवा देणार असेल. रेनॉल्ट मेगन-ई मध्ये इलेक्ट्रिक मोटर मिळणार आहे, डी २१७ बीएचपी पॉवर आणि ३०० न्यूटन मीटर पीक टॉर्क जनरेट करेल. कंपनीने दावा केला आहे की कार अवघ्या ८ सेंकदांमध्ये ताशी ० ते १०० किमीचा वेगाने ती धावू शकते. तसेच कारमध्ये ६०kWh ची बॅटरी मिळणार आहे. बॅटरी एकदा फूल चार्ज केल्यावर एकावेळी कार तब्बल ४५० किमी पर्यंत अंतर पार पाडू शकते.

- Advertisment -

Most Popular