27 C
Mumbai
Wednesday, September 27, 2023

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeIndia Newsनौदल ऑपरेशन ७०७

नौदल ऑपरेशन ७०७

बुडत्याला काठीचा आधार अशी उक्ती या वादळांमध्ये आली आहे. देश कोणत्याही संकटात असताना देशाच्या सशस्त्र सेना मदतीसाठी कायम पुढाकार घेतात. नौदलाच्या मदतीमुळे तौक्ते चक्रीवादळामध्ये भरकटलेल्या बार्ज पी ३०५ मधील १८४ नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात आली असून या सर्वांना घेऊन आयएनएस कोची मुंबईत दाखल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बार्ज वरील काही लोकांचा ठावठिकाणा अजून लागला नसून ते बेपत्ता असून त्यांचा शोध घेणे सुरु आहे. तौक्ते वादळामुळे मुंबईपासून सुमारे ३५-४० मैलावर बार्ज पी ३०५ भरकटत गेले होते. आयपीएस कोची, कमांडिंग ऑफिसर कॅप्टन सचिन सिक्वेरा यांनी जहाज आणि त्या वेळच्या भयावह परिस्थितीचा आंखोदेखा हाल सांगितला, ते म्हणाले कि, जहाज अत्यंत कठीण अशा परिस्थितीमध्ये  अडकले होते. मात्र नौदलाची मदत घटनास्थळी पोहचताच आम्ही तेथील परिस्थितीचा ताबा घेतल्याची  माहिती दिली. आम्ही बार्ज आणि चालक दल, साईटवरील इतरांसह शक्य त्यांना तितक्या चांगल्या प्रकारे सहाय्य केले. अजूनही विविध प्रकारे शोध मोहिम सुरु ठेवण्यात आली आहे. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात नौदल युनिट्स साइटवर असून, माझे जहाज नुकतेच माघारी आले आहे. साधारणत: १४ लोकांचे प्राण वाचविण्यासयश मिळाले आहे, जे माझ्यासोबत जहाजामध्ये आले आहेत, असेही त्यांनी पुढे सांगितले. दरम्यान, क्रु मेंबर अमित कुमार कुशवाह यांनी सांगितले की, बार्ज बुडत असल्याने मला समुद्रात उडी मारावी लागली. मी तब्बल ११ तास समुद्रामध्ये लाटांवर तरंगत होतो, त्यानंतर नौदलाच्या मदतीने आमची सुटका केली गेली.

ongc rescue cyclone

तौत्के चक्रीवादळ मुंबई किनारपट्टीवरून पुढे जात गुजरात किनारपट्टीच्या पुढे गेले खरे, पण जाताना संपूर्ण राज्यामध्ये या चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान घडून आले आहे. या चक्रीवादळा मुळे समुद्र किनाऱ्यावरील बऱ्याच जिल्ह्यांचे मोठे नुकसान झाले आहे. इतकेच नाही तर मुंबईजवळ समुद्रात या तौत्के चक्रीवादळाच्या काळामध्ये चार जहाजांवर एकूण ७१३ जण अडकून पडले होते. त्यातील ९३ जणाचा अजून काही शोध लागलेला नाही. आता त्या बार्जवरील १४ जणांचे मृतदेह हाती लागले  आहेत. संध्याकाळपर्यंत या चार जहाजांवरील ६२० जणांचे जीव वाचवण्यात नौदलाला यश मिळाले होते. मात्र ओएनजीसीची एक बार्ज पी ३०५ या चक्रीवादळामुळे भरकटत लांब गेली असून ती बुडाली असून त्या जहाजावरील नव्वदपेक्षा जास्त जण अद्यापही बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.

बार्ज पी ३०५ चे रेस्क्यू ऑपरेशन मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून लांब १७५ किलोमीटर अंतरावर हीरा फिल्ड्स दरम्यान अजूनही सुरु आहे. तोक्ते वादळाची सुरुवात झाल्यापासून म्हणजेच सोमवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून या ऑपरेशन ७०७ ची सुरुवात करण्यात आली होती. या बार्जवर एकूण २७३ जण उपस्थित होते. या जहाजावरील चालक दला सोबतच इतर सगळ्याचेच प्राण वाचवण्यासाठी आयएनएस कोलकाता आणि आयएनएस कोच्ची कसोसीने प्रयत्न करताना दिसत आहेत. बार्ज पी ३०५ मधून १८० जणांना वाचविण्यात यश आले आहे. सोमवारी रात्री सातच्या सुमारास हे जहाज बुडाले होते. काळोख झाल्याने शोध कार्यात अडथळा येत होता, तरीही त्या परिस्थितीमध्ये सुद्धा उर्वरित ९३ जणांचा शोध घेणे सुरु होते त्यातील सद्यस्थितीला १४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. ते मुंबईला आणण्याचे काम सुरु आहे. कोणाचीही अजून ओळख पटलेली नाही.

- Advertisment -

Most Popular