25 C
Mumbai
Thursday, November 21, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeLifestyleटेक्नोसेव्ही – बदल स्वीकारणे काळाची गरज

टेक्नोसेव्ही – बदल स्वीकारणे काळाची गरज

बदलत्या जीवन शैलीमुळे तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे. परंतु माणसाने मानवतेच्या दृष्टीने जगणे तितकेच महत्वाचे आहे. सुसंस्कारित माणूस बनून संगणकाचा वापर करणे. संगणक वापरामुळे व्यावहारिक खर्च कमी होणार आहे. कारण सगळीच माहिती केवळ एका संगणकावर असणार आहे. आधुनिक अशा या संगणक जीवन पद्धतीचा आजच्या काळात प्रत्येकाने स्वीकार करणे गरजेचे आहे. जीवनात नेहमी बदल होत असल्याने या बदलांचा अभ्यास करण्यासाठी आपण नेहमी अभ्यासूवृत्ती ठेवावी व नवे ज्ञान मिळवणे गरजेचे असते. एक काळ होता जेव्हा चलन म्हणून मातीची नाणी बनत, काळ बदलला, कधी तांब्याची नाणी आली, कधी चांदीची आली, कधी सोन्याची आली, कधी चामड्याची आली, हळू हळू कागदाचे चलन आले. आता आपण हा बदल स्वीकारला आहे, युगाला अनुसरून आता वेळ आली आहे की कागदाच्या चलनाचा काळ संपत आला आहे,आता डिजिटल चलन आपलेसे करण्याची गरज आहे. संपूर्ण आर्थिक वातावरण बदलू शकण्याची ताकद तंत्रज्ञानात आहे. आपण ते कसे उपयोगात आणायचे, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याचा कसा वापर करायचा यासाठी आपणचं प्रयत्न करायला हवा.

kids learning computer in day to day life

संगणक नावाच्या या यंत्राने आजच्या समाज जीवनावर सर्वांगीण परिणाम केलेला आहे. संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. यांत चिन्हांवर प्रक्रिया करणारी पद्धती किंवा व्यवस्था असून त्याची रचना व व्यवस्थापन असे असते की, ज्यामुळे माहिती स्वीकारणे, साठविणे, प्रदर्शित करणे आणि निकाल किंवा उत्तरे तयार करणे या प्रक्रिया आधीच साठवून ठेवलेल्या पाय-या पाय-यांनी बनलेल्या सूचना आपोआप केल्या जातात. संगणकाचा वापर रेल्वे, विमान, आरोग्य, बॅंक, उद्योगधंदे, शिक्षण, संशोधन, विमाक्षेत्र, विद्युतविभाग इत्यादी क्षेत्रामध्ये विविध कार्यांसाठी उपयोग केला जातो. त्यामुळे काळानुरूप आपलयात बदल घडवून आणणे अनिवार्यचं आहे. कोणताही क्षेत्र असे उरले नाही आहे जेथे संगणकाचा वापर होत नाही. आपण आपल्या व्यवसायाची वेबसाईट तयार केल्यास आपल्या मालाची परदेशात निर्यात करू शकता. संबंधीत रंगीत आकर्षक माहिती पत्रके, दरपत्रक आणि छापील पत्रके छापण्यास व ती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास बराच खर्च येतो. ही सर्व माहिती आपल्या वेबसाईटवर ठेवल्यास कोणासही व कोठेही पाहता येते वा छापून घेता येते. यामुळे छपाईचा वा पोस्टेजचा खर्च वाचतो. याशिवाय वेबसाईटवर फोटो, ध्वनी वा चित्रफिती अथवा संदर्भ साहित्य ठेवता येत असल्याने ग्राहकास उद्योग, उत्पादन व सेवा यांचे प्रत्यक्ष पण डिजिटल ज्ञान मिळू शकते. वेबसाईटवरूनच संपर्क साधण्याची व अधिक माहिती, शंका वा मागणी नोंदविण्याची सोय असल्याने ग्राहकास ते एकाच ठिकाणी फार सोयीचे ठरते. डीजीटल पेमेंट साठी क्रेडिट कार्डसारखी व्यवस्था असल्यास वेबसाईटवरूनच जागतिक स्तरावर खरेदी विक्रीचे व्यवहार होऊ शकतात. इंजिनिअरिंग वा बांधकामविषयक उद्योगात मोठी ड्रौईंग पाठवावी लागतात. नेहमीच्या इमेलने ती पाठविता येत नाहीत. अशा एक ना अनेक गोष्टी आपण संगणकाद्वारे शिकू शकतो. गरज आहे ती फक्त बदल स्वीकारण्याची.

- Advertisment -

Most Popular