27 C
Mumbai
Thursday, March 30, 2023

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeInternational Newsजगभरातील कोरोना लसीची सद्य स्थिती

जगभरातील कोरोना लसीची सद्य स्थिती

ऑक्सफर्डची लस लोकांमध्ये कोव्हिडची लक्षणं निर्माण होण्यापासून ७०% संरक्षण देत असल्याचं चाचण्यांमध्ये निष्पन्न झाले आहे. या लसीमुळे  वृद्ध व्यक्तींच्या शरीरातही चांगली प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे समोर आले आहे.

जगातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता वेगवेगळे देश कोरोनावर लस तयार करण्याचे काम करत आहेत. अजूनही कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. दुसऱ्या येणाऱ्या कोरोनाच्या लाटेबद्द्ल काही देश, राज्य अजून साशंक आहेत. जगातील अनेक लोकांना अजूनही कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे. सध्या विविध देशांमध्ये वेळीच केलेल्या उपाययोजना आणि  करण्यात आलेल्या लॉकडाऊनळेच आतापर्यंत अनेकांना याची लागण झाली नाही आणि मृत्यूदर अजून वाढला नाही.

लस उपलब्ध झाल्यास ती मानवी शरीरातल्या रोग प्रतिकारक शक्तीला कोरोना विषाणूला प्रतिकार असे करायचे ते शिकवते. यामुळे मुळातच कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही किंवा संसर्ग झालाच तर त्याचे गंभीर परिणाम शरीरावर दिसून येणार नाहीत. लस, योग्य उपचार पद्धती आणि त्याबरोबरचं घेतलेली खबरदारी या गोष्टी एकत्रित आल्या तरच कोरोना व्हायरसची ही साथ आटोक्यात येऊ शकेल.

भारतामध्ये सीरम इन्स्टिट्यूट कोरोनाच्या लसीच्या चाचण्या घेत आहे आणि या लशीचं उत्पादनही करत आहे. भारतामध्ये कोव्हिशील्ड या नावाने ही लस उपलब्ध असेल. सिरम इन्स्टिट्यूट कोव्हिड-१९ च्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी देशभरात सुरू झालेली आहे. सोबतच सिरम इन्स्टिट्यूट अधिकचे १० कोटी डोसेस तयार करणार आहे. सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातली चाचणी भारता मधील १७ शहरांमध्ये केली जाणार आहे.सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशील्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या ट्रायलचे निकाल याच वर्षी डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत येणे अपेक्षीत आहे. या लसीचे १० कोटी अधिक डोसेस तयार करून ते २०२१ मध्ये भारतासोबतच लघु आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये देण्यात येणार असल्याचं सिरम इन्स्टिट्यूट माहिती संस्थेचे प्रमुख अदर पुनावाला यांनी जाहीर केले होते.

ऑक्सफर्डची लस लोकांमध्ये कोव्हिडची लक्षणं निर्माण होण्यापासून ७०% संरक्षण देत असल्याचं चाचण्यांमध्ये निष्पन्न झाले आहे. या लसीमुळे  वृद्ध व्यक्तींच्या शरीरातही चांगली प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. या ट्रायल्समधल्या आकडेवारीवरून असं सूचित होते कि, लसीच्या डोसाचं प्रमाण बदलल्यास या लसीमुळे कोरोनापासून ९० टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळण्याची शक्यता आहे. युकेने या लसीच्या १० कोटी डोसेसची ऑर्डर दिलेली आहे. या लशीचे दोन डोस घ्यावे लागतील. २०,००० पेक्षा जास्त स्वयंसेवकांसोबतच्या चाचण्या अजूनही करण्यात येत आहेत. सगळ्या लसीपैकी कदाचित ही लस वितरीत करणं सगळ्यात सोपं असेल कारण ही लस अतिशय थंड तापमानामध्ये साठवून ठेवावी लागणार नाही असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

- Advertisment -

Most Popular