31 C
Mumbai
Thursday, November 21, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeCoronavirusशरीर प्रतिकारशक्ती वाढविणारे नुस्के - आजीच्या बटव्यातून

शरीर प्रतिकारशक्ती वाढविणारे नुस्के – आजीच्या बटव्यातून

देशामध्ये कोरोना संक्रमण दिवसागणिक वाढत चालले आहे. यामुळे प्रत्येकाने स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणे महत्वाचे आहे. कोरोना सारख्या साथीच्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी शरीर निरोगी असणे तसेच रोगप्रतिकारक शक्ती व्यवस्थित असणे गरजेचे आहे. यासाठी आपण सुरुवात पौष्टिक आहारापासून करावी. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती निरोगी असेल तर आपल्या कोरोनाचा संक्रमणाच्या त्रासातून कमी धोका निर्माण होतो. म्हणून या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे.

शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी किमान रोज 8-10 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर काढून टाकायला मदत करते. यामुळे रोगाचा संसर्गाचा धोका कमी होतो. पाणी आपले शरीर निरोगी आणि हायड्रेटेड ठेवते. शिवाय पाण्याचे महत्व आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचे आहे. पाण्याशिवाय आपल्या जीवनाची कल्पनाही करता येण अशक्य आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक भागाला पाण्याची आवश्यकता असते. पाणी केवळ अन्न पचनासाठी नाही तर मेंदू, हृदय आणि  फुफ्फुस यांच्या योग्य रीतीने कार्या करण्यासाठी सुद्धा महत्वाचे आहे.

increase immunity power in corona

आहाराप्रमाणे शरीराला योग्य आराम आणि व्यायाम सुद्धा गरजेचा आहे. दररोज 7 ते 8 तास निरोगी झोप घ्या. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. कमी झोपेमुळे शरीर  तणावग्रस्त राहते. शरीरामध्ये एनर्जी राहत नाही, सर्व कंटाळवाणे वाटू लागते. त्यामुळे झोपेच्या कमतरतेमुळे देखील प्रतिकारशक्तीवर परिणाम होऊ शकतो. चांगल्या आहाराबरोबरच नियमित व्यायाम करणे देखील शरीराला आवश्यक आहे. सध्याचाचं कल नव्हे पण डॉक्टर कायमच दररोज 30 ते 45 मिनिटे नियमित व्यायाम करण्याचा सल्ला देतात. नियमित व्यायाम केल्याने चयापचय क्षमता सुधारते. जे आपल्या शरीराची प्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करते. त्याचबरोबर, तणावमुक्त राहण्यासाठी दररोज मेडीटेशन करणे देखील चांगले आहे. प्रथिनेयुक्त आहार रक्तदाब आणि साखर पातळी नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. भाज्यांमध्ये टोमॅटो, मिरची, ब्रोकोली, पालक आणि मशरूम यासारख्या प्रथिनयुक्त हिरव्या भाज्या खाण्यावर भर दिला पाहिजे. जे संक्रमणाविरूद्ध लढायला मदत करतात.

natural immunity booster

अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरात वाढणार्‍या जीवाणू विरूद्ध लढायला मदत करतात. अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स बर्‍याच फळभाज्या आणि धान्यामध्ये आढळतात. लिंबूवर्गीय फळे शरीरात क जीवनसत्वाचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात. तसेच रोजच्या आहारात सिझनल फळे जसे कि लिंबू, संत्री, बदाम, गाजर, रताळे, केळी, पेरू, डाळिंब, शेंगदाणे, सोयाबीन, टोमॅटो यांचा समावेश करणे आवश्यक आहे. ज्यामुळे प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.

परंपरागत वापरत असलेले मसाले जसे हळद, आले, लवंगा, दालचिनी, वेलची यासारखे मसाले देखील शरीराच्या अनेक समस्यामध्ये उपयोगी पडतात. या मसाल्यांमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आणि अँटीऑक्सिडेंट असतात यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्याने देखील आरोग्यास फायदा होतो. ताजे फळे, भाज्या, सूप, नारळपाणी इत्यादी आपल्या शरीरात उर्जा निर्माण करतात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

- Advertisment -

Most Popular