27 C
Mumbai
Monday, August 8, 2022

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....

मध्य रेल्वे मुंबई भरती २०२२

मध्य रेल्वे मुंबई येथे रिक्त पदांची भरती...
HomeMaharashtra Newsमहाराष्ट्रात 10 वीच्या परीक्षा रद्द

महाराष्ट्रात 10 वीच्या परीक्षा रद्द

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 12 एप्रिल रोजी माननीय मुख्यमंत्री यांच्याबरोबर झालेल्या मिटिंग मध्ये दहावी आणि बारावी च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला होता आणि ही मिटींग झाल्यावरच इतर सर्व बोर्डांना देखील याबाबतची माहिती दिली गेली होती त्यानुसार सीबीएससी बोर्डाने परीक्षा कॅन्सल केली होती. अर्थात राष्ट्रीय स्तरावर दहावीच्या परीक्षा याआधीच रद्द झाल्या आहेत आणि तोच निर्णय महाराष्ट्र राज्य आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेत आहे

अर्थात यावर्षीच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत इंटरनल असेसमेंट द्वारे दहावीच्या विद्यार्थ्यांना गुण देऊन पास करण्यात येणार आहे पण ज्या विद्यार्थ्यांना अधिक गुणांची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी देखील कशाप्रकारे परीक्षा घेऊन मार्ग काढता येईल हे देखील लवकरच निर्णय शालेय शिक्षण मंडळाद्वारे करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आज दिली पण याच बरोबर बारावीच्या परीक्षा अजूनही रद्द झाल्या नाही आहेत त्याबाबतची नवीन माहिती लवकरच देऊ असेदेखील गायकवाड म्हणाल्या कोरोना च्या काळामध्ये महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांना आता कोणती परीक्षा न देता 11 वी च्या शाखेमध्ये जाणे सुलभ झाले आहे.

दहावीच्या परीक्षा कॅन्सल झाल्याबद्दल पालकांमध्ये संमिश्र भावना असल्या तरीदेखील विद्यार्थी खुश असल्याचे दिसून आले आहे गेल्या वर्षभरामध्ये अशा प्रकारच्या बऱ्याच परीक्षा कॅन्सल होऊन विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.

- Advertisment -

Most Popular