केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांचचं कोरोनाची निर्बंधित लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. २८ एप्रिलपासून रजिस्ट्रेशन करण्यासाठी म्हणून या १८ ते ४५ वर्षावरील सर्वाना आपल्या नावाची नोंद करता येणार आहे. पूर्वीसारखे नोंदणीशिवाय कोरोना लसीकरणाच्या केंद्रावर थेट जाऊन लस मिळणार नाही. केंद्र सरकारने या वयोगटातील लोकांना आपल्या नावाची नोंद ऑनलाईन पद्धतीने करण्याचे आवाहन केंल आहे. केंद्र सरकारच्या कोविन अॅप आणि cowin.gov.in या वेबसाईटवर लसी साठी नाव नोंदणी करता येणार आहे. प्रत्येकाने ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्याने लसीचे वेळेवर नियोजन करायलाही मदत होईल तसेच लसीकरण केंद्रावर होणारी गर्दीही नियंत्रणात राहण्यास मदत होईल असंही सांगण्यात आले. भारतामध्ये आतापर्यंत १४ कोटी लोकांचे कोरोनाच्या निर्बंधित लसीचे लसीकरण करण्यात आले आहे. आणि कोरोनाच्या पहिल्या डोससाठी आता पर्यंत केवळ ११.६ टक्के लोकांनीच ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना ऑनलाईन पद्धतीने उर्वरित सर्वांचे जास्तीत जास्त प्रमाणात रजिस्ट्रेशन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
देशामध्ये १ मे पासून कोरोना लसीकरणा साठीचा तिसरा टप्पा सुरु होणार असून त्यामध्ये १८ वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये फ्रन्टलाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. तर दुसऱ्या टप्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. आता केंद्र सरकारने राज्यांना थेट कंपन्यांकडूनचं कोरोनाची लस खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आपल्या आवश्यकतेनुसार आता राज्य सरकार खुल्या बाजारातून लस खरेदी करू शकणार आहे.
महाराष्ट्रात येत्या १ मे पासून लसीकरणाचा व्यापक स्वरूपातील कार्यक्रम सुरू करण्यात येत असून त्यामध्ये जवळपास ८.५ कोटी लोकांना लसी देण्यात येणार आहेत. तसेच राज्यातील लसीकरणाचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी राज्य सरकार आता परदेशातूनही कोरोनाच्या लसी आयात करणार आहे. तसेच ब्रिटन शासनाच्या धर्तीवर राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे कि, राज्यातील सर्व खात्यांचे फंड आता कोरोनाच्या लसीकरणाच्या मोहिमेसाठी वापरण्यात येणार आहेत.
देशात १६ जानेवारीपासून सुरु करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यातील १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण १ मे पासून सुरुवात होत आहे. या लसीकरण मोहिमेची आगाऊ नोंदणी २८ एप्रिलपासून सुरू होणार असून, आरोग्य मंत्रालयाने ट्विटरवर पोस्ट शेअर करत याबाबतीतील माहिती दिली आहे. नोंदणी अधिकृत वेबसाइट cowin.gov.in वर होईल.