26 C
Mumbai
Friday, July 19, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeInternational Newsअमेरिकेचा निर्णय अखेर मागे

अमेरिकेचा निर्णय अखेर मागे

भारत आणि अमेरिका या दोनही देशामध्ये कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक प्रमाणात पसरला आहे. भारतामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अमेरिकेने भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला  आहे. अमेरिकेने भारतासाठी 318 ऑक्सिजन कंसंट्रेटर पाठविले असून अमेरिकेतून या मशीन्स घेऊन एअर इंडियाच्या विमानाने रवाना झाली आहेत. अवघ्या काही तासातच या मशीन्स भारतात दाखल होणार असून त्यामुळे ऑक्सिजनची आवश्यकता असणार्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी याबाबतची माहिती ट्वीटरवरून शेअर केली आहे. परंतु अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी कोरोना लस बनवण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घालून भारताला मोठा धक्काच दिला. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या या निर्णयावर सर्वस्तरातून टीकाही करण्यात झाली. परंतू, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्या चर्चेनंतर यावर दोन्ही देशांसाठी समझोत्याचा तोडगा निघताना दिसत आहे.

अमेरिकेने आता बंदीची भूमिका मागे घेऊन संकट काळात भारताला आवश्यक ते सर्व सहकार्य करणार असल्याच म्हटलं आहे. या सकारात्मक बदला दरम्यानच अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. ज्यामध्ये त्यांनी कोरोना संकटामध्ये भारताला हरतर्हेने मदत करण्यास कटिबद्ध असल्याचा आश्वासन दिले आहे.

joe biden statement

कोरोना संकटावर मात करण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तीचा अमूल्य जीव वाचवण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाकडून हा प्रयत्न करण्यात आल्याचे सिंग यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ऑक्सिजन कंसंट्रेटर म्हणजे नक्की कशा प्रकारचे मशीन असते, त्याबद्दल थोडक्यात त्यांनी माहिती दिली, ही मशीन  सामान्य हवेद्वारे ऑक्सिजन तयार करणारे यंत्र आहे. ही मशीन नक्कीच रुग्णांसाठी एक प्रकारची जीवन संजीवनी ठरणार आहे. तसेच ऑक्सिजन कंसंट्रेटर हे होम आयसोलेट असलेल्यां रूग्णांसाठी एक उपयुक्त पर्याय आहे. देशामध्ये बीपीएल आणि फिलिप्स या दोन मुख्य कंपन्या या मशीनचे उत्पादन करतात. हे ऑक्सिजन कंसंट्रेटर ऑक्सिजन सिलिंडरपेक्षा खूप वेगळे असतात. एका मेडिकल ऑक्सिजन कंसंट्रेटरसाठी अंदाजे खर्च 30 ते 60 हजार रुपयापर्यंत येतो. तसेच यामध्ये मशीन्स ही पोर्टबल असून त्यांचा आकार खूप छोटा असून त्याची किंमत साधारण 3 ते 5 हजार रुपये एवढी असते. या मशीन वीज किंवा बॅटरीवर चालतात.

ऑक्सिजन सिलेंडर आणि आणि संपल्यावर त्यांचे करण्यात येणारे रिफलिंग या सगळ्याच्या तुलनेत ही मशीन्स स्वस्त आणि अतिशय सुरक्षित आहेत. कंसंट्रेटर ऑक्सिजनचे नवीन मॉल्युक्लर बनवत नाहीत. तर हवेतील नायट्रोजन वेगळे करून, त्यातून ऑक्सिजन कायम टिकून राहतो. भारतातील कोरोनाचं संकट लक्षात घेता, पाकिस्तानसह अनेक देशांनी भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. महामारीच्या काळात जेव्हा आम्ही संकटात होतो. तेव्हा भारताने आम्हाला मदत केली. आता भारताच्या संकटावेळी आम्ही त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत, असं अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी सांगितलं.  

- Advertisment -

Most Popular