मुंबई उच्च न्यायलयाने राज्यात वाढणाऱ्या कोरोना संसर्गाची दुसरया लाटेसंदर्भात झपाट्याने वाढत चाललेल्या मृत्यूदरासाठी आरोग्य यंत्रणा कुठेतरी कमी पडत असल्याचे दिसत आहे, परिणामी अनेक कोरोना रुग्णांचा वेळेवर न मिळणाऱ्या उपचारा अभावी मृत्यू होत आहे. त्यामुळे स्मशानभूमीमध्ये प्रेत सुद्धा वेटिंग वर ठेवली जात आहेत, तर काही जिल्ह्यांमध्ये जागेअभावी अनेक मृतदेहांवर एकत्रित रित्या अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. परंतु स्मशानातील ही विदारक स्थिती पाहून यासंदर्भात आता मुंबई हाय कोर्टाने दखल घेतली आहे. हाय कोर्टाने सर्व आरोग्य यंत्रणांना बजावले आहे कि, जोपर्यंत स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात दिला जाऊ नये.
सध्या सुरु असलेली कोरोनाची लाट एवढी वेगाने पसरत आहे कि, मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या तुलनेत उपलब्ध व्यवस्था पुरेशी पडत नाही. राज्याचा रोजचा मृत्युदर पाहता, राज्यभरातील स्मशानातील अंत्यसंस्काराच्या ठिकाणांची स्थितीवर उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाला हायकोर्टाने आदेश दिले आहेत. त्याच बरोबर अवेळी झालेला मृत्यू, त्यामुळे मृत्यू झालेल्यांची शव शवागृहात ठेवण्यात येतात, राज्यभरातील शवागृहांची परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. कोरोना काळातील समस्यांबाबत हायकोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने या सूचनावजा आदेश जरी केले आहेत.
मागील दोन आठवड्यापासून बीड जिल्ह्यामध्ये एक हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत तसेच या वाढीव रुग्णांसोबत दिवसेंदिवस रूग्णांच्या मृत्यू संख्येमध्येसुद्धा वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसामध्ये अंबजोगाईत कोरोनामुळे मृत झालेल्या 30 रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 28 जणांना अग्नी देऊन तर दोन जणांचा दफनविधी प्रमाणे करण्यात आले. तर काही दिवसांपूर्वी त्याच ठिकाणी एका सरणावर आठ शवांना एकत्रितपणे अग्नि देऊन अंतिम संस्कार करण्यात आले. एवढी तेथील परिस्थिती भयानक झाली आहे. पुण्यातील स्थिती काही वेगळ बोलत नाही. दररोज वाढत्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूमुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी कित्येक तास ताटकळत राहावे लागत आहे. म्हणजे कोरोनामध्ये जगण पण कठीण आणि मरणासाठी सुद्धा वेटिंग अशी अवस्था बनली आहे. काही वेळा तर आदल्या दिवशी आणलेले शव दुसर्या दिवसापर्यंत तसेच ठेवून वाट पहावी लगत आहे. स्मशानभूमी चोवीस तास धगधगत आहे, पण अशा वेळी स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांची सुद्धा कसोटीच म्हणावी लागत आहे. नातेवाईक सुद्धा लांबच्या लांब रांगांमध्ये उभे आहेत.
देशातील कोरोनाची भयावह स्थिती लक्षात घेउन सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी सुरू केली आहे. तसेच कोरोना लसींच्या सर्व ठिकाणच्या वेगवेगळ्या किंमतीवरून सर्वोच्च न्यायालयाने आता केंद्र सरकारला फटकारलं असून लसींच्या विविध ठिकाणच्या वेगवेगळ्या किंमतीवर केंद्र सरकारची भूमिका काय असणार असा प्रश्न केला जात आहे. देशामध्ये लस या विविध ठिकाणी वेगवेगळ्या किंमतीला मिळणार असण्याचे नेमके काय कारण आहे हे केंद्र सरकारने स्पष्ट करावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे.
रणदीपसिंग सुरजेवाला यांनीही या स्मशानात लागलेल्या रांगांचे हृदद्रावक चित्र बघून ट्वीट करून यावर सणकून टीका केली आहे. हे घडणारे सर्व मानवतेच्या विरोधात आहे. हा एक प्रकारचा गुन्हा असून, अंत्यसंस्कारा साठी लांबच्या लांब लागलेल्या या रांगा अहंकारी दगडाच्या काळजाचे शासक असल्याचा पुरावा असल्याचे त्यांनी ट्विट केलं आहे. आपल्याच जनतेचे मृत्यू होत आहेत. अशा घटनांमुळे कोणतेही सरकार मजबूत होऊ शकत नाही. या हृदय हेलावून टाकणाऱ्या घटना आणि सर्वत्र व्हायरल झालेले फोटो हे मोदी सरकारचा आयुष्यभर पिच्छा पुरवतील, अशी दाहक टीका ही त्यांनी केली आहे.