31 C
Mumbai
Thursday, November 21, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeMaharashtra Newsशेवटी हिमवृष्टीमध्येही शिखर सरं केलचं

शेवटी हिमवृष्टीमध्येही शिखर सरं केलचं

नेपाळमधील हिमालयाच्या अन्नपूर्णा हिमालय पर्वतरांगेमध्ये माऊंट अन्नपूर्णा 1 हे शिखर स्थित आहे. या पर्वतरांगेमध्ये एकापेक्षा एक अशी अतिशय उंच शिखरे असून अन्नपूर्णा पर्वत शिखर समूह त्यामध्ये विशेष प्रसिद्ध आहे. या पर्वतरांगेमधील 16 शिखरांनची उंची 6 हजार मीटरपेक्षा जास्त आहेत, तर 13 शिखरे ही 7 हजार मीटरपेक्षा उंच आहेत, त्यातील अन्नपूर्णा-1 ची उंची 8 मीटर पेक्षा जास्त असेलेलं शिखर आहे. एकूण 55 किलोमीटर लांबीचे असलेले अन्नपूर्णा शिखर समूह हा गंडकी व मार्श्यंगदी नद्यांच्या हिमनद्यांनी वेढलेला आहे. गिर्यारोहाणामध्ये अन्नपूर्णा पर्वत शिखर चढाई करणे,  हे अत्यंत कष्टाचे मानले जाते. चढाई करताना एक ना अनेक संकटांचा सामना करावा लागतो, सततचे होणारे हिमवर्षाव, मधीच येणारी वार्याची वादळ, अतिशय तीव्र धारांचा चढाईचा मार्ग यांमुळे अन्नपूर्णा 1 या शिखरावर चढाई करणे,  हे अत्यंत जबाबदारीचे काम आहे. आत्तापर्यंत माऊंट अन्नपूर्णा-1 शिखराची यशस्वी चढाई जेमतेम 250 च्या आसपास गिर्यारोहकांनी केल्याची नोंद आहे.

summit Annapurna

पुण्यातील गिरिप्रेमी या अग्रगणी गिर्यारोहण संस्थेचे गिर्यारोहक भूषण हर्षे, डॉ. सुमित मांदळे व जितेंद्र गवारे यांनी जगातील दहावे उंच शिखर माऊंट अन्नपूर्णा-1 जे 8091 मीटर्स उंच असून त्यावर यशस्वीरित्या चढाई केली आहे. ज्येष्ठ अनुभवी गिर्यारोहक व श्री शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित उमेश झिरपे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली ही गिरिप्रेमीची संस्थेची आठवी अष्टहजारी मोहीम असून अशी कामगिरी पार पडणारी गिरिप्रेमी ही भारतातील पहिली नागरी गिर्यारोहण संस्था आहे. गुरुवारी मध्यरात्री कॅम्प 4 वर झालेल्या प्रचंड हिमवर्षावामुळे अंतिम शिखर चढाईला सुरूवात करण्यासचं उशीर झाला, कॅम्प 4 हून अंतिम शिखर चढाई करायला सुरूवात करताना पहाटेच्या वेळीस आधी हिमवृष्टी आणि मग वार्‍याच्या वाढलेल्या वेगमुळे चढाईची गती पूर्णतः मंदावली होती. त्यानंतर दुपारी 12 च्या दरम्यान रूट ओपनिंग करणार्‍या शेर्पा संघाने यशस्वी चढाई करून, मागोमाग गिरिप्रेमीच्या सदस्यांनी सुद्धा शिखरमाथा गाठला. पूर्ण रात्रभर चढाई करताना ग्रुपला वेगवान वार्‍याचा व अगदी हाडे गोठवून टाकणाऱ्या थंडीचा सामना करावा लागला. गिर्यारोहकांचे शिखरमाथ्याच्या काही मीटर खाली असलेल्या घळीमधून चढाई करताना प्राण पणाला लागले. या सर्व अडचणींचा सामना करत सुमित, भूषण आणि जितेंद्र यांनी 14 तासांच्या अथक आणि अविरत चढाईनंतर दुपारी 2.15 च्या सुमारास माऊंट अन्नपूर्णा-१ यशस्वीरीत्या सर केले.

Giripremi's Annapurna Team

गिरिप्रेमी या संस्थेने याआधीही अनेक उंचच्या उंच शिखरे यशस्वीरीत्या सर केली आहेत. प्रत्येक वर्षी शक्यतो एक तरी शिखर सर करायचे असा जणू चंगच बांधला आहे, शेवटी म्हणतात ना इच्छा असेल तर मार्ग दिसेल तसेच त्यांनीही 2012 साली त्यांनी माऊंट एव्हरेस्ट, चौथे उंच शिखर माऊंट ल्होत्से 2013 साली, पाचवे उंच शिखर माऊंट मकालू हे 2014 साली, तर 2016 साली सहाव्या क्रमांकावर असेलेलं उंच शिखर माऊंट च्यो ओयू व माऊंट धौलागिरी सातवे उंच शिखर, 2017 साली माऊंट मनास्लू आठवे उंच शिखर तर 2019 साली तिसरे उंच शिखर माऊंट कांचनजुंगा अशा सात शिखरांवर यशस्वीपणे चढाई केली. गिरिप्रेमीच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

- Advertisment -

Most Popular