26 C
Mumbai
Friday, July 19, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeTech Newsस्मार्टफोन Oppo A74 5G लाँच आधीच डेटा लिक

स्मार्टफोन Oppo A74 5G लाँच आधीच डेटा लिक

ओप्पोचा नवा स्मार्टफोन Oppo A74 5G हा २० एप्रिलला भारतात लाँच होण्याचे वृत्त कंपनीच्या अधिकृत ट्विटर पेजवरून देण्यात आले आहे. त्याचसोबतच ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर सुद्धा हा स्मार्टफोन लिस्ट करण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक खास वैशिष्ट्ये असण्याची शक्यता वृत्त हाती आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. त्याचबरोबर यात पंचहोल डिझाईन डिस्प्ले सुद्धा असणार आहे. त्यामुळे सर्व ओप्पो प्रेमींमध्ये या स्मार्टफोनबद्दलची उत्कंठा वाढली आहे. परंतु, काही माहिती नेटवर आधीच लिक झाली आहे.

लीक झालेल्या माहितीनुसार Oppo A74 5G च्या स्पेसिफिकेशन विषयी बघायचे झाले तर, यामध्ये 6.5 इंचाचा FHD+ डिस्प्ले मिलणार असून त्याचे रिजोल्युशल हाय रिफ्रेश रेटला 1080 x 2400 पिक्सल एवढे असणार आहे. त्याचबरोबर यात अमोल्ड डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसर वापर केला गेला आहे. Oppo A74 5G च्या स्मार्तफोन मध्ये 48MP चा रियर कॅमेरा दिला आहे, तर 2MP चे दोन कॅमेरे मिळतील. या स्मार्टफोनला 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनमध्ये डबल 5G नेटवर्क सपोर्ट दिला गेला आहे. त्यामुळे हा फोन ड्युल सिम कार्डला सपोर्ट करेल.

Oppo A74 5G स्मार्टफोन हा चीनमधील OPPO A93 5G ची आवृत्ती असल्याचे म्हटले जात आहे. वापरकर्त्यांना डिव्हाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या कॅमेरा सेटअपमध्ये पहिला कॅमेरा 48 एमपी वाइड एंगल लेन्स, दुसरा कॅमेरा 2 एमपी मॅक्रो लेन्स आणि तिसरा कॅमेरमध्ये 2 एमपी खोलीचा सेन्सर दिला गेला आहे. तर त्याच्या समोर 8 एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. Oppo A74 5G मध्ये , जीपीएस, ब्लूटूथ, वाय-फाय आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट दिले आहेत. याशिवाय या र्स्मार्टफोनमध्ये 4 जी एलटीई, ड्युअल बँड वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ 5.1 आणि यूएसबी टाइप-सी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. ओप्पोचे उपाध्यक्ष तस्लीम आरिफ यांनी ट्विट करून सांगितले आहे कि, , भारतात Oppo A74 5G ची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे याची गणना कंपनीच्या सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनमध्ये केली जाईल.

- Advertisment -

Most Popular