भारतातील कोरोनाच्या स्थितीचा विस्फोट पाहता, अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटनने तर भारताला रेड लिस्ट मध्ये ठेवले आहे. तर दुसरीकडे अमिरातने गुरुवारी जाहीर घोषणा करून सांगितले कि, दुबई ते भारत या गों देशांदरम्यानच्या सर्व फ्लाईटस पुढील 10 दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. 25 एप्रिल पासून पुढील दहा दिवस भारत आणि दुबई दरम्यानची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी फ्रान्सने देखील भारतातून येणाऱ्या सर्व पर्यटकांवर प्रवेश बंदीचं लागू करणार असल्याचे सांगितले आहे. यापूर्वीही चिली, ब्राझील आणि अर्जेंटिना मधून येणाऱ्या पर्यटकांवरही बंदी घालण्यात आली होती. तर येत्या शनिवारपासून भारतीय पर्यटकांच्या प्रवेशावर नवीन कडक निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारचे प्रवक्ते गॅब्रिएल अटाल यांनीही याची पुष्टी केली असून, फ्रान्स 3 मेपासून देशांतर्गत प्रवासावरील बंदी उठवेल, परंतु रात्रीचे कर्फ्यू संध्याकाळी सात ते पहाटे सहा पर्यंत कायम निर्बंधितचं राहतील. तसेच त्यांनी सांगितले की, एप्रिलच्या सुरूवातीपासून जी अनावश्यक वस्तूंची दुकाने लॉकडाऊनमुळे बंद केली होती, ती दुकाने काहीही कारणास्तव मे च्या मध्यापूर्वी उघडता येणार नाही आहेत. फ्रान्सने कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी या महिन्याच्या सुरुवातीलाच ब्राझील मधून येणारी उड्डाणे तात्पुरती थांबवलेली होती.
भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने येथे कोरोनाने हाहाकार उडविलेला दिसून येत आहे. सोशल मीडियाद्वारे भारतातील कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेली दुसऱ्या लाटेची चिंताजनक स्थिती पाहता, या परिस्थितीत जगातील आजूबाजूच्या इतर देशांवरचा ताण वाढलेला दिसत आहे. आता फ्रान्सने देशाच्या खबरदारीसाठी म्हणून भारतातून येणाऱ्या प्रवाश्यांना 10 दिवस क्वारंटाईन होणे बंधनकारक केले आहे. यापूर्वी अमेरिकेने सुद्धा भारतातील कोवीस परीस्थिती पाहता, आपल्या अमेरिकन नागरिकांना भारताचा प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेने असे सांगितले आहे की, जरी लोकांनी कोरोना निर्बंधित लस घेतली असली तरी, त्यांनी देखील भारताची सद्य परिस्थितीत भारतात जाणे कटाक्षाने टाळावे. त्याच प्रमाणे हा धोका लक्षात घेउन ब्रिटनने देखील भारताला रेड लिस्ट मध्ये समाविष्ट केले आहे. फ्रान्सने याआधीही ब्राझीलहून येणाऱ्या सर्व विमानसेवांवर बंदी घातलेली होती. यासह, सरकारने असे स्पष्ट सुद्धा केले आहे कि, जे पर्यटक अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिकेतून येणार असतील अशा लोकांनाही क्वारंटाईन होणे अनिवार्य आहे. कोरोना संसर्गाबद्दल घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारने आधीच सांगितले आहे कि, जिथे कोरोना संक्रमण परिस्थिती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे, तेथे त्या देशांची कोरोना स्थिती लक्षात घेऊनचं कठोर निर्णय घेणे गरजेचे ठरेल. आवश्यकता भासली तर आगामी काळामध्ये पूर्णत: प्रवास बंदीही करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.