28 C
Mumbai
Wednesday, July 6, 2022

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....

मध्य रेल्वे मुंबई भरती २०२२

मध्य रेल्वे मुंबई येथे रिक्त पदांची भरती...
HomeLifestyle Newsवाचाल तर वाचाल - जागतिक पुस्तक दिन

वाचाल तर वाचाल – जागतिक पुस्तक दिन

दरवर्षी २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन साजरा केला जातो. मलेशियाची राजधानी असलेलं क्वालालंपूर वर्ल्ड बुक कॅपिटल २०२० आहे. जगभरात युनेस्को आणि संबंधित असलेल्या संस्था जागतिक पुस्तक दिन आवर्जून साजरा करण्याकडे लक्ष पुरवितात. लोकांमध्ये डिजिटली पुस्तकांपेक्षा प्रत्यक्ष पुस्तकांप्रती असलेला लगाव, वाचनाची सवय वाढवून ज्ञानामध्ये भर पाडून घेणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हेचं या दिवसाचे प्रमुख्य उद्दीष्ट आहे.

जगातील ख्यातनाम व्यक्तीं विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हंटिस आणि इंका गार्सिलोसो यांचा या दिवशी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी म्हणून युनेस्कोने २३ एप्रिलला या दिवसाची निवड जागतिक पुस्तक दिवास म्हणून केली. २३ एप्रिल १९२३ रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी हा दिवस प्रथमतः साजरा केला. स्पेनमध्ये मिगेल डे सर्व्हांटिसच्या स्मरणार्थ म्हणून हा दिवस साजरा केला गेला. त्यानंतर १९९५ मध्ये पॅरिसमध्ये युनेस्कोची सर्वसाधारण सभा पार पडली, ज्यामध्ये जगभरातील लेखकांप्रती आदर आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच पुस्तकवाचनामध्ये रस निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्षी जागतिक पुस्तक दिन साजरा कण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.

world book day

कॉपीराइट पाहायला गेलं तर ही एक कायदेशीर संज्ञा आहे. एखाद्या लेखकाचे किंवा निर्मात्याचे  त्याने स्वरचीत केलेल्या कोणत्याही रचनेवर मर्यादित काळासाठी विशिष्ट हक्क असतात. ज्या कंपनीला किंवा ज्यास तो ते वापरण्याचे अधिकार विकतो,  ती व्यक्ती ही रचना व्यावसायिक किंवा इतर कारणांसाठी कुठेही त्याचा वापर करु शकते. कधीकधी लेखक किंवा निर्माता तसा प्रकाशन संस्थेशी करार करतो. व यानंतर कॉपीराइटचा अधिकार त्या एका विशिष्ट प्रकाशनासाठी बांधील ठेवला जातो, त्या प्रकाशना व्यतिरिक्त अन्य कोणीही ती रचना वा साहित्य कायदेशीर परवानगी पत्राशिवाय वापरू शकत नाही. जर कोणी या कायद्याचे उल्लंघन केले तर तो कायदेशीर गुन्हा ठरू शकतो, त्याच्या विरूद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते.

दरवर्षी,  जागतिक पुस्तक दिनाची एक विशिष्ट थीम ठरवली जाते. यावर्षीच्या थीमचा विषय  ज्ञान देण्याबरोबर पुस्तकांमध्ये मनोरंजन करण्याची अद्वितीय क्षमता आहे  हा आहे. विवध प्रकारची पुस्तके आपण पहिली असतील, प्रत्यके पुस्तकाचे वर्गीकरण सुद्धा विविध प्रकारामध्ये केले जाते, जसे कि, कथा, कविता, कादंबरी, ग्रंथ, प्रवास वर्णन, ऐतिहासिक गोष्टी, गूढ कथा, शैक्षणिक साहित्य, लहान मुलांच्या गोष्टी अशा एक ना अनेक प्रकारामध्ये पाहायला मिळते. ही पुस्तके आपल्या ज्ञानात नक्कीच भर पाडतात,  यात शंकाच नाही. परंतु याच पुस्तकांमध्ये बर्‍याच मनोरंजक गोष्टी देखील वाचायला मिळतात. ती आपले मनोरंजन देखील करतात. आपली भाषा देखील पुस्तकाद्वारे सुधारते.

girl reading book

जगामध्ये या दिवसाचे नियोजन वेगवेगळ्या देशांप्रमाणे तिथल्या विविध पद्धतींनुसार साजरे केले जाते. वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन त्या दिवशी केले जाते. काहीजण पुस्तके विनामूल्य वितरित करतात, तर कुठे पुस्तकांशी संबंधित स्पर्धा आयोजित केल्या जातात. स्पेनमध्ये दोन दिवस रीडिंग मॅरेथॉनचं आयोजन केलं जाते. या मॅरेथॉनच्या अखेरीला एका लेखकाला प्रतिष्टेचा मानला जाणार मिगेल डे सर्व्हांटिस पुरस्कार प्रदान केला जातो. स्वीडनमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लेखन किंवा वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन केले जाते.

- Advertisment -

Most Popular