आज जगभराम्ध्ये गुड फ्रायडे साजरा केला जातो. ख्रिश्चन समाजामध्ये या दिवसाचं महत्व खूप मोठं आहे. आजचा दिवस येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. जगभरातील चर्चमध्ये आजच्या दिवशी धार्मिक प्रार्थना व सभांचं आयोजन केल जात. इस्टर संडेच्या आधी येणारा शुक्रवार गुड फ्रायडे म्हणून साजरा केला जातो. येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा दिवस म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्माचे पालन करणारे लोक या दिवसाची तयारी ४० दिवसापासून आधीपासूनच करत असतात. आजच्या दिवशी चर्च मध्ये केल्या जाणाऱ्या प्रार्थनेमध्ये येशूच्या बलिदानाचे स्मरण केले जाते. येशू ख्रिस्त जगाला प्रेम आणि करुणेचा संदेश देऊन गेले.
रोम राजाच्या एका आदेशानंतर येशूला शुक्रवारच्या दिवशीच सुळावर लटकवण्यात आलेले, त्या काळामध्ये अंधश्रद्धा, अंधविश्वास आणि खोट्या गोष्टी पसरवणाऱ्या धर्मगुरुंचा प्रचंड सुळसुळाट होता. परंतु, या परिस्थितीत सुद्धा येशूने समाजाला योग्य वळण देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे येशूच्या प्रसिद्धी मध्ये वाढ होत गेली. येशूचे कार्य हे सर्वाना पटणारे नव्हते. त्यांमुळे येशूच्या विरोधात अनेकांनी रोमच्या राजाचे कान भरले व रोमच्या राजाने येशूला सुळावर लटकवण्याचा निर्णय घेतला. येशूने आपले सगळे जीवन समाजातील दुबळ्या लोकांच्या कल्याणासाठी व्यतीत केले. गुड फ्रायडेच्या तिसऱ्या दिवसाला त्याला इस्टर संडे म्हटलं जातं, येशूला हसावर लटकवल्यानंतर येशू पुन्हा जीवंत झाला आणि त्यापुढे 40 दिवस लोकांच्यामध्ये जाऊन त्याने संदेश दिला असं पुराणात म्हटल जाते. येशूच्या पुन्हा जिवंत होण्याच्या दिवसाला इस्टर संडे म्हटले जात असून दरवषी साजरे केले जाते. या वर्षी इस्टर संडे 4 एप्रिलला साजरा करण्यात येत आहे. जगभरातील ख्रिश्चन बांधवांकडून या दिवशीही चर्चमध्ये प्रार्थना केली जाते. बायबलच्या अंतिम सात वाक्यांचे गुड फ्रायडेच्या दिवशी स्मरण केले जाते.
बायबलच्या माहितीनुसार, येशूंनी ज्या दिवशी आपले बलिदान दिले तो दिवस शुक्रवार होता. त्यामुळे या दिवसाला गुड फ्रायडे म्हटले जात असून जगभरात हा दिवस विशेष प्रकारे साजरा केला जातो. या दिवशी ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. जगभरातील चर्चमध्ये या दिवशी विशेष प्रार्थनांचे आयोजन केलेले असते. काही ख्रिस्ती पारंपारिक देशांमध्ये येशुनी बलिदान दिल्याने हा दिवस राष्ट्रीय दु:खवट्याप्रमाणे साजरा केला जातो. र्यामुळे या दिवशी कोणताही आनंददायी कार्यक्रम साजरा करण्यात येत नाही. येशूने दिलेल्या बलिदानाबद्दल काही ख्रिस्ती लोक चर्च मध्ये जाउन कृतज्ञता व्यक्त करतात. मात्र, गेल्या वर्षीपासून कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानाला या महिन्यात १ वर्ष पूर्ण होत आले आहे या कारणास्तव गुड फ्रायडे घरीच राहून साजरा करण्यात येत आहे.