HomeIndia Newsमुकेश अंबानीची नवीन क्षेत्रात गुंतवणूक

मुकेश अंबानीची नवीन क्षेत्रात गुंतवणूक

अमेरिकेची कंपनी असलेल्या स्काय ट्रॅन या पर्सनल रॅपिड ट्रान्झिट कंपनीमध्ये तब्बल २५.७६ मिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. टेलिकॉम आणि रिटेल क्षेत्रानंतर आता मुकेश अंबानी यांनी थेट उर्जा क्षेत्रात गुंतवणूक करून टेस्ला कंपनीच्या इलॉन मस्क समवेत भिडणार आहेत. मुकेश अंबानी यांनी आपली मोठी गुंतवणूक आता उर्जा आणि ट्रान्पोर्टेशन या क्षेत्रात केली आहे. अंबानी यांनी स्काय ट्रॅन या अमेरिकन कंपनीची भागिदारी विकत घेतली असून, स्काय ट्रॅन ही कंपनी पॉड टॅक्सी तयार करण्याचे काम करते. ही सुविधा ऑटोमेशनवर कार्य करते. त्यामुळे अंबानींनी आता या क्षेत्रातील इलॉन मस्क यांना सरळ आव्हान दिले असल्याची वार्ता चर्चिली जात आहे. त्यामुळे येत्या काळात या दोन अब्जाधिशांमध्ये अटीतटीची स्पर्धा बघायला मिळणार आहे.

मुकेश अंबानी यांनी उर्जा क्षेत्रातील आपली गुंतवणूक वाढवली आहे. येत्या काही काळात ईलेक्ट्रोनिक कारच्या व्यवसायातही गुंतवणूक करण्याची शक्यता निर्माण होत आहे. पर्सनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमसारख्या विद्युत वाहनांचा स्काय ट्रॅन ही अमेरिकन कंपनी विकास करते. हा प्रोजेक्ट पूर्णत: सौर ऊर्जेवर आधारित असल्याने पर्यावरणातील प्रदूषणाला धोका निर्माण होण्याची जराशी शक्यता नाही, तसेच कोणत्याही अडथळ्या शिवाय प्रवासी वाहतूक पार पडू शकते. यापूर्वी अॅमेझॉनशी मुकेश अंबानी यांची स्पर्धा पहायला मिळाली होती. रिटेल आणि होलसेल श्रेत्रामध्ये रिलायन्सने फ्यूचर ग्रुपशी एक डील केली होती, त्यावर अॅमेझॉनने आक्षेप घेतलेला पाहण्यात आले होते. सध्या सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सुरु आहे.  रिलायन्सच्या 2020 सालच्या अहवालात असे नमूद करण्यात आलं आहे कि, येत्या काळात रिलायंस कंपनी ही ईलेक्ट्रोनिक कारची बॅटरी आणि ट्रान्सपोर्टसाठी हायड्रोजनच्या विकासामध्ये भर देणार आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार रिलायन्स आपल्या रिफायनरीजमधून निघणाऱ्या फीडस्टॉक पासून हाय व्हॅल्यू प्रोडक्ट बनवण्यासाठी मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी अंबानी यांनी यावर बोलताना सांगितलं होतं की रिलायन्सकडे अशा पद्धतीचे तंत्रज्ञान आधीपासून उपलब्ध आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्टच्या आकडेवारीनुसार मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि साल २०२० मध्ये त्यांची संपत्तीत 24% नी वाढ झाली आहे. जानेवारी २०२१ पर्यंत त्यांची एकूण मालमत्ता भारतीय चलनात अंदाजे ६.१० लाख कोटी रुपये एवढी आहे.  हुरुनने जाहीर केलेल्या यादीनुसार संपूर्ण आशियामधील रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी हे दुसरे श्रीमंत व्यक्ती आहे, तर जगातील आठवे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.  मंगळवारी जाहीर केलेल्या ग्लोबल रिच लिस्ट 2021 नुसार ६८ देशांमधील ३,२२८ अब्जाधीशां पैकी भारतीयवंशाचे २०९ आहेत. या भारतीय अब्जाधीशांपैकी 177 लोक देशात राहत आहेत. गौतम अदानीचे नाव मुकेश अंबानीनंतर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून द्वितीय क्रमांकावर आहे. 2020 मध्ये त्यांची संपत्ती दुपपट वाढली आहे. गौतम अदानी यांची संपत्ती 2.35 लाख कोटी रुपये इतकी आहे आणि जगभरातील श्रीमंत लोकांच्या यादिमध्ये त्यांचा ४८ वा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी त्यांचे बंधू विनोद अदानी यांच्या संपत्तीमध्ये १२८% नी वाढ झाली असून त्यांची एकूण मालमत्ता ७२ हजार कोटींच्या घरात  आहे. या अहवालात १५ जानेवारी २०२१ पर्यंतच्या अब्जाधीशांची आणि त्यांच्या कुटुंबियांची मालमत्ता समाविष्ट करण्यात आली आहे. त्यानंतर एचसीएल आयटी कंपनीचे शिव नाडरच्या नवे २७ अब्ज डॉलर्सची  संपत्ती असून भारतातील अब्जाधीशांच्या यादीत ते तिसर्‍या क्रमांकावर आहे. आनंद महिंद्रा यांची महिंद्रा ग्रुपच्या प्रॉपर्टीमध्ये १००% नी वाढ झाली असून ती आत्ता 2.4 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे.

- Advertisment -

Most Popular