27 C
Mumbai
Wednesday, December 11, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeMaharashtra News६ मार्चला असलेली भराडी देवीची यात्रा रद्द

६ मार्चला असलेली भराडी देवीची यात्रा रद्द

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे यावर्षी ६ मार्चला असलेली भराडी देवीची यात्रा भाविकांसाठी रद्द करण्यात आली आहे. सिंधुदुर्गच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी या यात्रेसाठी काही निर्बंध घातले असून, भाविकांना यात्रेला न येण्याचं आवाहन केलं गेलं आहे. भराडी देवी यात्रा भाविकांसाठी रद्द झाली असली तरी यात्रेच्या  संबंधित सर्व धार्मिक कार्यक्रम दोन दिवस मंदिरात सुरू राहणार आहेत. यंदा आंगणेवाडी जत्रा अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ च्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्यांनी माझी जत्रा माझी जबाबदारी,  असं अभियान जत्रेत राबवणार असल्याचं सांगितल आहे. त्यामुळे यावर्षीची यात्रा ही केवळ आंगणे कुटुंबियांपुरती मर्यादीत ठेवण्याचा निर्णय शासनाकडून घेतला गेला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, यंदा आंगणेवाडी येथील भराडी देवीची यात्रा केवळ आंगणे कुटुंबियांपुरती मर्यादित असणार असून या कुटुंबातील ५०–५० व्यक्तींना मंदिरात प्रवेश स्वीकारला जाणार आहे. तसेच आदेशानुसार, यात्रेच्या दिवशी मंदिरात येणाऱ्या आंगणे कुटूंबियांना ओळखपत्रे पुरवण्यात येणार आहेत. मंदिरात आंगणे कुटुंबियांशिवाय  इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन यात्रेदरम्यान करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आंगणे कुटुंबियांस दिल्या आहेत. सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रेला दरवर्षी लाखो भक्तगण मोठ्या भक्तीभावाने येतात. यंदा ६ मार्च रोजी नियोजित भराडी देवीची यात्रा होती. मात्र, यावर्षी कोरोना विषाणूचं सावट भराडी देवीच्या यात्रेवर दिसत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी यात्रेसंदर्भात विशेष सूचना आणि निर्बंध जाहिर केले आहेत. आंगणेवाडीला येताना लागणारे मालवण, कणकवली, मसुरे मार्ग देखील सील करण्यात येणार आहेत.

Bharadi devi festival yatra cancels due to corona

कोरोनाच्या सावटामुळे देवांचीही लॉकडाऊन होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आंगणेवाडी इथल्या भराडी देवीची यात्रा ६ मार्च रोजी आयोजित होती, व प्रथेप्रमाणे दोन महिन्यांपूर्वीचं आंगणे कुटुंबीयांनी यावर्षीच्या भराडी देवीच्या जत्रेची तारीख ६ मार्च जाहीर केलेली. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी केवळ आंगणे कुटुंबियांपुरती मर्यादित यात्रा होणार आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे देवीची यात्रा केवळ आंगणे कुटुंबियांच्या उपस्थितीत होऊन मंदिरामधील धार्मिक विधी पार पाडले जातील. तसंच यात्रेत भाविकांना प्रवेश नसल्याचं आंगणे कुटुंबियांनी स्पष्ट केलं आहे. सिंधुदुर्ग प्रशासनानेही अन्य भाविकांना यात्रा रद्द झाल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांवर राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने निर्बंध घातले आहेत. आंगणेवाडी येथे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कोरोन आणि यात्रेच्या पार्श्वभूमीवर आंगणे कुटुंबीयांनी सुद्धा मर्यादित होणाऱ्या आंगणेवाडी यात्रेत आंगणे कुटुंबीयांचीही एकत्रित पणे वेळी गर्दी होऊ नये या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आंगणे कुटुंबीय मंडळ यांची यात्रा नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी मंदिर परिसराची पाहणी करत आवश्यक त्या सूचना जारी केल्या.

Bharadi devi festival yatra

आंगणे कुटूंबियांनपैकी दर्शनासाठी येणाऱ्या सर्वाना त्यांची ओळखपत्रे देण्यात येणार आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना मंदिरात प्रवेश स्वीकारला जाणार नाही, फक्त आणि फक्त आंगणे कुटुंबीयांनाच यात्रा कालावधीत मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. प्रशासनाकडून दिलेल्या नियमांवलींचे काटेकोरपणे पालन केले जाईल. मंदिराकडे जाणारे रस्ते मालवण, कणकवली,  मसुरे या तिन्ही गावांच्या मार्गावर पोलीस प्रशासनाने बॅरिकेट्स लावून मार्ग सील केले आहेत. अन्य भाविकांना यात्रेत आणि मंदिरात प्रवेश नसल्याचे प्रशासनाने पूर्वसूचना देऊन स्पष्ट केले आहे. आंगणे कुटुंबियांचे ओळखपत्र असलेल्या व्यतिरिक्त अन्य कोणासही प्रवेश दिला जाणार नाही, अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी घरूनच देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा. आंगणेवाडी यात्रा फक्त आंगणे कुटुंबियांसाठी मर्यादित असून  इतर कोणालाही यात्रेत प्रवेश नाही. राजकारणी अथवा मीडियाची लोक, पत्रकार यांनाही यात्रेत मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

- Advertisment -

Most Popular