26 C
Mumbai
Friday, July 19, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeInternational Newsउत्तर कोरियाने बनविले सर्वात शक्तिशाली मिसाइल

उत्तर कोरियाने बनविले सर्वात शक्तिशाली मिसाइल

उत्तर कोरिया हा देश विशेषतः ओळखला जातो तो त्याचा हुकुमशहा किम जोंग उन यामुळेच, त्याचप्रमाणे हा देश छोटा असून सुद्धा त्यांची लष्करी ताकद इतर बलाढ्य देशांपेक्षा जास्त आहे. कोरोन काळामध्ये सुद्धा उत्तर कोरिया शक्तिशाली मिसाईलं बनविण्याच्या कार्यात मग्न होते. उत्तर कोरियाने आणखी एक अणुबॉम्ब तयार केल्याचे वृत्त कानावर आले आहे. यावर्षाच्या सुरुवातीपासूनच कोरियाने नवनवीन क्षेपणास्त्रे बनविण्याचे काम सुरु केले आहे. नुकतेच त्यांनी बॅलिस्टिक मिसाइल लॉंच केले. जगामध्ये सर्वात शक्तिशाली मिसाइल म्हणून बॅलिस्टिक चा उल्लेख केला जातो. तसेच  कोरिया मध्ये अशा शक्तिशाली तब्बल १ नव्हे तर ४ मिसाइल आहेत.

उत्तर कोरियाने ह्वासोंग-१५ नावाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) नावाची नवीन मिसाइल शोधली आहे. उत्तर कोरियाचे हे ह्वासोंग-१५ नावाचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सुमारे १३ हजार किलोमीटर एवढ्या अंतरावर धडक मारण्यास सक्षम आहे, असा उत्तर कोरिया दावा करत आहे. उत्तर कोरिया स्थापना दिनानिमित्त हे प्रथमच जगासमोर आणले आहे.

जगातील सर्वात शक्तिशाली महासत्ता असलेला देश अमेरिका आणि उत्तर कोरिया यांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर कदाचित अमेरिकेला किम जोंग उन शी लढा देणे कठीण जाण्याची शक्यता आहे. जरी उत्तर कोरिया हा लहान देश असला तरी त्या देशाकडे किती सैन्य आहे,या देशात कोणत्या प्रकारची अण्वस्त्रे आहेत. याची कोणालाच माहिती नाही आहे. परंतु या देशात लहान अंतरांपासून लांब पल्ल्या पर्यंत प्रहार करू शकणारी विविध प्रकारची अण्वस्त्रे स्वतः निर्माण केलेली आहेत. त्याचप्रमाणे एका अंदाजानुसार कॉंग्रेसयनल रिसर्च सर्व्हिसच्या अंदाजानुसार किमकडे जगातील सर्वात प्राणघातक रासायनिक शस्त्र आहेत, असे मानले जाते. उत्तर कोरियाच्या सैन्यात जवळजवळ अडीच ते पाच हजार मेट्रिक टन प्राणघातक नर्व्ह एजेंट्स आहेत, ज्याचा उपयोग लाखो लोकांना एकाच वेळी मारण्यासाठी केला जाऊ शकतो. जर महासत्ता अमेरिका किंवा इतर कोणताही देश अधिक युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून आक्रमक झाला तर कोणत्याही देशाच्या देशाच्या विरोधात कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन रासायनिक शस्त्रे वापरण्यात जास्त विचार करत बसणार नाही.

- Advertisment -

Most Popular