25 C
Mumbai
Tuesday, March 19, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeDevotionमोठमोठ्या देवस्थानांमध्ये अजूनही फक्त ऑनलाईन पास धारकांनाच प्रवेश

मोठमोठ्या देवस्थानांमध्ये अजूनही फक्त ऑनलाईन पास धारकांनाच प्रवेश

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे शासकीय नियमांच्या अखत्यारीत उघडण्यात आली. मागील काही महिने सर्वत्र सुरु असलेला कोरोन व्हायरस च्या संसर्गामुळे सगळीकडे विशेष सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. ८ महिन्यांपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यांतर्गत सर्व धार्मिक स्थळे त्याच बरोबर पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली होती. लोक सार्वजनिक ठिकाणी , मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे सावधगिरी म्हणून सरकारने सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे, चर्च, मशीद इ. सर्व धार्मिक स्थळांवर घातलेली बंदी आज ८ महिन्यांनतर शिथिल केली.

शिर्डी संस्थान. तिरुपती बालाजी, तुळजा भवानी संस्थान इत्यादीं सारख्या मोठ्या संस्थानांनी सुद्धा मंदिरे जनतेसाठी खुली केली आहेत, परंतु त्याला काही निर्बंध घालण्यात आले आहेत. दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सर्व मंदिरे खुली जनतेसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे सामान्य जनतेचा आनंद द्विगुणीत झाला आहे. काही ठिकाणी या आनंदात. फटाके वाजवून, पेढ्यांचे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला आहे. शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याशी शक्यता असल्या कारणाने शिर्डी संस्थानाने कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून ऑनलाईन पासची व्यवस्था केली अही. ज्यांच्याकडे पास असेल तेवढ्याच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. एरवी दिवसाला  ५० हजार पर्यंत भाविक दर्शनाला येत असत. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती संख्या ६ हजारांवर केली गेली आहे. आणि फक्त पास धाराकांनाच प्रवेश देण्याची सोय केली आहे. अशाच प्रकारचा निर्णय तिरुपती संस्थानाने सुद्धा घेतला आहे. समाधी मंदिर व्यतिरिक्त निवासाची सोय असलेले भक्त निवास, प्रसादालय हे सुद्धा कालांतराने कधी आणि कसे सुरु करायचे, याचा निर्णय विशेष बैठकीनंतर घेण्यात येईल.

काही ठिकाणी मंदिरामध्ये जरी सर्व सामान्य जनतेला प्रवेश दिला जात असला तरी, १० वर्षांच्या आतील आणि ६० वर्षाच्या वरील जेष्ठ नागरिक यांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. आणि सर्वसामान्य जनतेने देखील मास्क, सेनिटायझर चा वापर करणे अनिवार्य केला आहे त्याचप्रमाणे दर्शन रांगेमध्ये किमान २ व्यक्तींमध्ये ठराविक अन्तर ठेवून उभे राहण्याचे आवाहन संस्थेमार्फत केले गेले आहे.

- Advertisment -

Most Popular