30 C
Mumbai
Friday, October 11, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeInternational Newsऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला पुन्हा कोरोनावर मात करणारी लसीची चाचणी घेण्यासाठी मिळाली परवानगी

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला पुन्हा कोरोनावर मात करणारी लसीची चाचणी घेण्यासाठी मिळाली परवानगी

जगभरामध्ये सुरु असलेला कोरोनाचा कहर लक्षात घेता भारतासह बऱ्याच देशांमध्ये त्यावरील लस लवकर निर्माण करण्याच्या कामात आहेत. परंतु लस बनवण्याच्या प्रयत्नांना फार मोठा झटका बसला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटिश-स्वीडिश कंपनी अॅस्ट्राझेनका यांनी तयार केलेल्या कोरोनावरील लस तिच्या मानवी चाचणीच्या टप्प्यात होती ब्रिटनमध्ये एका व्यक्तिवर ऑक्‍सफर्डने बनवलेल्या कोरोनावरील लसीचा प्रयोग करण्यात आला. परंतु, त्या लसीचा त्याच्या शरारीवर काहीतरी दुष्परिणाम झाल्याचं समोर आले. त्यामुळे ऑक्‍सफर्डच्या AZD1222 लसीची तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटिश-स्वीडिश कंपनी एस्ट्राजेनिकाच्या बनविण्यात येणाऱ्या लसीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले होते परंतु, ब्रिटनमढील एका व्यक्तीच्या शरीरावर गंभीर दुष्‍परिणाम म्हणजे लस किंवा औषध दिल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. त्या व्यक्तीच्या शरीरावर नेमका काय दुष्परिणाम झाला हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण हा रुग्ण लवकर बरा होण्याची चिन्ह दिसत आहेत. विविध आजारांवर लसी बनवण्याची प्रक्रिया सुरु असताना अचानक चाचणी रोखणं ही बाब काही नवी नाही आहे. परंतु, ही लस बनवण्यात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनिका आघाडीवर होतेत. अ‍ॅस्ट्राझेनेकाने कंपनीने एक निवेदन जारी करत याबाबतची माहिती दिली होती. मात्र, भारतातील चाचण्या सुरुच राहणार असल्याने सीरम इन्स्टिट्यूटने दिली आहे.

नवीन वर्ष म्हणजेच २०२१ च्या सुरुवातीलाच पहिल्या महिन्यात ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे, असे ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक मागील आठवड्यात म्हणाले होते. जगभरातून या विशेष लसीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी येण्यास सुरुवात झाली होती. भारतामधून सुद्धा या लसीसाठी मागणी केली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जगभरामध्ये लाखो लोक मृत्यू पावली आहेत,त्याचप्रमाणे कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे कोटयावधी लोक बेरोजगार झाली आहेत. यूकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य नियामक मंडळाच्या शिफारशीनंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटिश-स्वीडिश कंपनी अॅस्ट्राझेनका ला पुन्हा आपल्या लसीची चाचणी सुरु करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांना ChAdOx1 nCoV-19 लसीच्या यशाबाबत खात्री आहे.शिवाय त्यांना ८० टक्के विश्वास आहे की ही लस सप्टेंबरमध्ये उपलब्ध केली जाईल. ऑक्सफर्डच्या लसीचं उत्पादन AstraZeneca  ही कंपनी करणार आहे. ही लस ChAdOx1 व्हायरसपासून बनली आहे.

- Advertisment -

Most Popular