27 C
Mumbai
Wednesday, December 11, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeEntertainmentकार्तिक आर्यन धर्मा प्रोडक्शनमधून बाहेर

कार्तिक आर्यन धर्मा प्रोडक्शनमधून बाहेर

‘प्यार का पंचनामा’ चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलेला अभिनेता कार्तिक आर्यन याने बॉलिवूडमध्ये आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी खूप संघर्षांचा सामना केला आहे. त्याच्या कर्तुत्वावर मोठ्या निर्माते आणि दिग्दर्शकांकडून त्याला चित्रपटाच्या ऑफर्सदेखील येऊ लागल्या. धर्मा प्रोडक्शन निर्मित करन जोहरच्या दोस्ताना 2 मध्ये त्याला संधी मिळाली. कधीतरी करन जोहरच्या धर्मा प्रोडक्शनसोबत काम करायचं, असे कार्तिक आर्यनचं हे एक स्वप्न होत. मात्र काही कारणांमुळे सिनेमा यायच्या आधीच कार्तिक आर्यनचा आणि करन जोहरच्या धर्मा प्रोडक्शनशी वाद निर्माण झाले. त्यामुळे करन जोहरनं कार्तिक आर्यनला दोस्ताना 2 मधून बाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे.

दोस्ताना 2 मध्ये लीड रोल मिळालेल्या कार्तिक आर्यनला सिनेमातून का काढण्यात आले यावर उलट सुलट चर्चा सुरु असताना, विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे कि, कार्तिक आर्यनचे अनप्रोफेशनल वागणे आणि सिनेमाच्या स्क्रिप्टवरुन झालेले मतभेद या सर्व प्रकरणाला कारणीभूत ठरले आहेत. तसेच दीड वर्षांनंतर कार्तिक आर्यनने दोस्ताना 2 च्या स्क्रिप्टमध्ये बदल करण्यात यावे अशी त्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, कार्तिकच्या या अनडिसिप्लीन वागणुकीमुळं धर्मा प्रोडक्शनने या चित्रपटातून त्याला काढून टाकले असून, त्याच्यासोबत यापुढे कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Kartik Aryan and Karan Johar Issue

दोस्ताना 2 चित्रपटाची कार्तिक आर्यन, जान्हवी कपूर आणि लक्ष्य लालवानी सहकालाकारांसह आतापर्यंत 20 दिवसांची शूटिंग देखील पूर्ण झाली आहे. मागील वर्ष कोरोनाच्या विळख्यात असल्याने या सिनेमाची शूटिंग झाली नव्हती. 2019 साली या चित्रपटामधील काही सीनचं चित्रीकरण झालेलं होते आणि लवकरच या सिनेमाची शुटिंग देखील सुरु करण्यात येणार होती. मात्र त्याआधीच कार्तिक आर्यन कडून हा  चित्रपट काढून घेतला गेला आहे. आता या सिनेमात मुख्य भूमिकेत कार्तिक ऐवजी कोणाची वर्णी लागणार याबाबत काहीच माहिती नसून उत्सुकता मात्र निर्माण झाली आहे. लवकरच याची सुद्धा घोषणा केली जाईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

KARTIK AARYAN

धर्मा प्रोडक्शन या निर्मिती संस्थेअतर्गत साकारल्या जाणाऱ्या दोस्ताना 2 या चित्रपटातून कार्तिक आर्यनला काढण्यात आल्याची अधिकृत माहिती समोर आल्यावर अनेकांना आश्चर्य वाटले. ज्यानंतर कलाविश्वात अनेक उलट सुलट चर्चांनी जोरही पकडला. यातच अभिनेत्री कंगना राणावतने करण जोहरला निशाण्यावर घेत, सुशांतप्रमाणे आता कार्तिकलाही गळफास घेऊन आत्महत्या करायला भाग पाडू नकोस अशा बोचऱ्या शब्दांत टीका केली. ‘कार्तिक स्वत:च्या मेहनतीने इथे पोहोचला आहे. स्वत:च्याच बळावर तो असाच पुढे जात राहील. सुशांतप्रमाणे त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडू नका, गिधाडांनो सोडा त्याला एकटं..निघून जा इथून तुम्ही., असं कंगनानं ट्विट केल आहे.

तसेच, कार्तिकला ट्वीट करून धीर देत, तू यांना घाबरू नको, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत असं म्हणत करण जोहर, धर्मा प्रोडक्शन आणि कलाविश्वात कायम होणाऱ्या घराणेशाहीला धारेवर धरत कंगनाने कथित प्रतिष्ठीत मंडळींनाही धारेवर धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा घराणेशाही आणि सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर वादंग निर्माण झाला आहे.

- Advertisment -

Most Popular