27 C
Mumbai
Wednesday, July 6, 2022

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....

मध्य रेल्वे मुंबई भरती २०२२

मध्य रेल्वे मुंबई येथे रिक्त पदांची भरती...
HomeTech Newsपिंक व्हॉट्सएप

पिंक व्हॉट्सएप

सध्या व्हॉट्सएपच्या बाबतीत एक मेसेज खूप व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये व्हॉट्सएपला गुलाबी रंगामध्ये (Pink Whatsapp) बदलण्याचा दावा केल गेला आहे. तसेच त्या संदेशासोबत एक लिंकही दिली गेली आहे. सायबर तज्ज्ञांनी संदेशामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला दिला आहे. लिंकवर क्लिक केल्याने आपला फोन हॅक होऊन व्हॉट्सएप चा वापर करणे शक्य होणार नाही. नक्की हे काय प्रकरण आहे, पाहूया थोडक्यात.

व्हायरल मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की लिंकवर क्लिक केल्यास व्हॉट्सअॅपचा रंग गुलाबी होईल आणि त्यात अनेक नवीन फीचर्स समाविष्ट होत जातील. व्हॉट्सएपचे हे अद्ययावत अपडेट असल्याचे म्हणण्यात आले आहे. सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ राजशेखर राजहरिया यांनी सोशल मीडियावर असे आवाहन केले आहे की, पिंक व्हाट्सएपबाबत सावधानता बाळगा. व्हाट्सएप ग्रुपमध्ये एपीके डाउनलोड लिंकद्वारे व्हायरस पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘राजशेखर रजहरिया यांनी व्हॉट्सएप पिंकच्या कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन केल आहे.

pink whatsapp malware

सायबर सिक्युरिटी कंपनी वोयागेर इन्फोसेकचे संचालक जितेन जैन यांनीही त्याच वेळी वापरकर्त्यांना गुगल किंवा अपलच्या अधिकृत एप स्टोअर व्यतिरिक्त एपीके किंवा इतर मोबाइल एप स्थापित न करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की या प्रकारच्या एपद्वारे आपल्या फोनचे फोटो, एसएमएस, संपर्क इत्यादी माहितीची चोरी होण्याची शक्यता असते. व्हाट्सएपशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जर कोणाला संशयास्पद संदेश किंवा ई-मेलसहित संदेश मिळाला असेल तर आधी त्याची सखोल चौकशी करा आणि सावध दृष्टिकोन ठेउनच उत्तर द्या. व्हॉट्सएपवर आम्ही लोकांना आम्ही पुरविलेल्या सुविधांचा वापर करून आम्हाला फीडबक पाठवा, तसेच काही संपर्काविषयी माहिती द्यावी किंवा ब्लॉक करा अशी सूचना करून ठेवतो. प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे तुम्ही कोणत्याही लिंकवर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सएपचा लोगो किंवा थीमचा रंग बदलणं तांत्रिकदृष्ट्या शक्य गोष्ट नाही. अशा काही बदलांबद्दल कंपनीकडून अधिकृतरित्या माहिती वेळोवेळी पुरवली जाईल.

अकाऊंटमधील माहिती चोरण्याच्या उद्देशाने सध्या पिंक व्हॉट्सएपची लिंक पसरवली जात आहे. सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने देखील अशाप्रकारच्या लिंक्सवर क्लिक करणं धोकादायक ठरू शकत. यामुळे फोन हॅक होऊ शकतो. व्हॉट्सअ‍ॅप पिंक इंस्टॉलेशन लिंक पासून सुरक्षित राहण्यासाठी एकही प्रमाणात सतर्क राहणे गरजेचे आहे. जसे कि गिफ्ट्चं आमिष दाखवणारी लिंक्स उघडू नका, युआरएल मध्ये काही स्पेलिंग चुकल आहे का बघा. संशयित असलेल्या लिंक्स इतर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवर शेअर करून अफवा पसरवणे टाळा.

- Advertisment -

Most Popular