30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeCoronavirusकोरोना नक्की आला कुठून?

कोरोना नक्की आला कुठून?

गेले वर्षभर कोरोना महामारीचा झालेला उद्रेक पाहता, सर्वजण चीनच्या नांवाने बोट मोडत असतील. पण नक्की कोरोना विषाणूचा प्रसार झाला कुठुन (coronavirus origin) आणि कसा? त्यानंतर तो मानवापर्यंत कसा पोहोचला गेला? या एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्यासाठी गेल्या वर्षापासून शास्त्रज्ञांचा कसून शोध व अभ्यास सुरु आहे. अलीकडेचं हे जाणून घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या टीम चीनमधील वुहान शहराला भेट देण्यास आणि नेमक खर काय ते जाणून घेण्यासाठी गेली होती. वास्तव पाहता प्रथम कोरोना संसर्गाची नोंद वुहानमध्येचं झाली होती. कोरोना विषाणू वुहानमधील लॅबमधून पसरविण्याचा आरोप चीनवर करण्यात आला होता.परंतु, अद्यापही चीनने या आरोपांना विरोधचं केला आहे. आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशने केलेल्या वूहानच्या दौरा अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की, वुहान लॅबमधून कोरोना पसरलेला नसून त्याचा संसर्ग एका प्राण्याद्वारे मनुष्यास झालेला आहे.

कोरोना विषाणूची उत्पत्ती शोधण्यासाठी चीनच्या दौऱ्यावर गेलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या सांगण्यानुसार, कोरोना विषाणू वटवाघुळपासून इतर प्राण्यांच्या माध्यमातून मानवांमध्ये पसरला गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॅबमधून व्हायरस पसरण्याच्या शक्यतेचे प्रमाण फारच कमी आहे.

where corona virus started

मीडियाच्या हाती आलेल्या अहवालानुसार, जागतिक आरोग्य संघटनेच्या तपास पथकाने लॅबमधून व्हायरस गळती करण्या संदर्भातील पसरलेल्या चर्चेला पूर्णविराम देऊन पुढील तपासणीसाठी इतर सर्व बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या आठवड्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, येत्या काही दिवसांत कोरोनाच्या उत्पत्ती काह्सी आणि कोठून झाली या संदर्भातील अहवाल जाहीर केला जाईल अशी अपेक्षा आहे. हा अहवाल चार तत्त्वे आणि एका संभाव्य निष्कर्षावर आधारित आहे. वूहांच्या दौर्यावरून आल्यानंतरही सदरचा अहवाल प्रसिद्ध होण्यास विलंब होत असल्यामुळे पुन्हा अनेक तर्हेचे प्रश्न उपस्थित होत आहेत. सुरुवातील चीनवर जागतिक स्थरातून वुहान शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळल्यानंतर हजारो आरोप करण्यात येत होतेत. मात्र, आता लवकरात लवकर जागतिक आरोग्य संघटना यासंदर्भातील आपला अहवाल सादर करणार आहे.

कोविड 19 म्हणजेच कोरोना महामारीतील विषाणुची उत्पत्ती कशी आणि कोठून झाली याबाबत जगभरात संशोधन सुरु झाले आहे. त्यावर अनेक वाद, चर्चा, दावे प्रतिदावे केले गेले आहेत. यामधून 2019 मध्ये हा विषाणू वुहान येथील प्रयोगशाळेतूंच पसरून इथपर्यंत आला आणि तसेच जगभर पसरला ते प्रोजन फूडच्या माध्यमाद्वारे हा विषाणू तयार झाला इथपर्यंत अनेक दावे केले गेलेले. या दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. त्यात कोल्ड चेन कंटेमिनेशनलमुळे कोरोना विषाणूची निर्मिती किंवा प्रसाराची शक्यता कमी आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

china is origin of coronavirus

AFP वृत्तसंस्थेने सांगितलेल्या वृत्तानुसार, जागतिक आरोग्य संघटनेकडून नेमण्यात आलेले पथक व चीनी वैज्ञानिकांनी संयुक्तरित्या लावलेल्या शोध आणि केलेल्या पाहणीनुसार केलेल्या तपासामध्ये म्हटले आहे की, कोल्ड चेन कंटेमिनेशनल मुळे कोरोना निर्मिती अथवा प्रसाराची शक्यता अगदी अशक्यप्राय आहे. त्यांनी पुढे असेही वक्तव्य केले आहे की, चीनमध्ये कोविडची  डिसेंबर महिन्यातील सुरुवात प्रोजन फूडमुळे असाधरपणे झाली असावी. कारण या काळामध्ये या व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला नव्हता. कोरोना विषाणू हा वटवाघळांच्या माध्यमातून पसरला असावा, असा संशय संशोधकांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -

Most Popular