देशात कोरोनाग्रस्त रुग्णसंख्यमध्ये सातत्याने वाढत होत चालली आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्यासोबत बैठक घेतली असून यावेळेला संपूर्ण लॉकडाउनची आवश्यकता नाही, सद्य स्थितीत वीकेंड आणि नाईट कर्फ्यू गरजेचा आहे. नाईट कर्फ्यूला कोरोना कर्फ्यू हा शब्द वापरला तर लोकांपर्यंत जो योग्य संदेश पोहोचला पाहिजे तो नक्की पोहोचेल, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या झालेल्या बैठकीमध्ये प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांना ११ एप्रिल ते १४ एप्रिल कालावधीमध्ये लसीकरण उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ११ एप्रिलला असणारी ज्योतिबा फुले जयंती, तर १४ एप्रिलला असणारी डॉ. आंबेडकर जयंती यांचे औचित्य साधून लसीकरण उत्सव साजरा करावयाचे आवाहन केले आहे. या कालावाधीमध्ये कोरोनावरील लसीचा एकही डोस वाया जाता कामा नये. जास्तीत जास्त लसीकरण पार पडले पाहिजे. यामुळे देशातील हे महामारीचे दुषित वातावरण बदलण्यास मदत होईल. याप्रसंगी, पंतप्रधान मोदींनी सांगितलं, या लसीकरण उत्सवासाठी केंद्र सरकार आवश्यकता असतील तितक्या लसींचा पुरवठा करेल. लसीकरण महोत्सवात जास्तीत जास्त लोकांचे लसीकारण व्हावे, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. तुमच्या आसपास जर 45 वर्षांच्या पुढे राहणारी माणसे असतील, तर त्यांना लसीकरणासाठी सर्वतोपरी मदत करण्याची मी देशातील तरूणांना विनंती करत आहे, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं.
टीका उत्सव पर देशवासियों से आग्रह। pic.twitter.com/GvGV3OCnP7
— PMO India (@PMOIndia) April 11, 2021
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, देशाने आत्ता कोरोनाच्या पहिल्या टप्पा कधीच पार केला आहे. तसेच यापूर्वीच काही राज्यनी पहिल्या टप्प्यातील सर्वोच्च पातळी गाठली आहे. तर अनेक राज्ये या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाईट कर्फ्यू लावणे योग्य असून त्याला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे, फक्त त्यांनी नाईट कर्फ्यूचा उल्लेख आपण कोरोना कर्फ्यू करावा असा असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला. काही लोकाना कोरोना फक्त रात्रीच पसरतो का? असा प्रश्न खूपच सतावत आहे, त्यावर पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, जगभरामध्ये देखील नाईट कर्फ्यू फॉर्म्युला अवलंबला गेला आहे.
कोरोना कर्फ्यूची कालावधीची सुरुवात रात्री 10 वाजल्यापासून, सकाळपर्यंत सुरु ठेवण्यात आली पाहिजे. लोकांना सावध करण्यासाठी हे उपयुक्त होऊ शकत. आपल्याला Test, Track, Treat यावर जास्तीत जास्त भर द्यावा लागणार आहे. तसेच मायक्रो कंटेनमेंट झोनवर सुद्धा अधिक प्रमाणात भर देणे आवश्यकतेच आहे. कंटेनमेंट झोनमध्ये असणार्या सगळ्यांची कोरोना टेस्ट अनिर्वार्य केली पाहिजे. याचा जरुर फायदा होईल. तसेच एखादी व्यक्ती कोरोना संसर्गीत निघाल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या किमान 30 जणांची कोरोन चाचणी अथवा तपासणी केली पाहिजे, असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सल्ला दिला.