27 C
Mumbai
Monday, August 8, 2022

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....

मध्य रेल्वे मुंबई भरती २०२२

मध्य रेल्वे मुंबई येथे रिक्त पदांची भरती...
HomeMaharashtra Newsलॉकडाऊनमध्ये काय आहे बंद आणि काय आहे सुरु ?

लॉकडाऊनमध्ये काय आहे बंद आणि काय आहे सुरु ?

अत्यावश्यक सुविधा पुरवणारी सर्व दुकानं, राज्यातील सर्व अत्यावश्यक सेवा- मेडिकल, दुध, किराणा फळं आणि भाज्या, कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोना संसर्ग रोखण्याचे सर्व नियम पाळून सुरू राहील.

महाराष्ट्रात कोव्हिड-19 चा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. राज्यात शुक्रवारी एकूण 58 हजार नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार पूर्ण लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार,विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. गरज नसताना आणि वैध कामाशिवाय घराबाहेर नागरिकांनी पडू नये, अशी सूचना राज्य सरकारने केली आहे. विकेंड लॉकडाऊन आणि कोरोना निर्बंधात काय सुरु आणि काय बंद, याबाबत लोकांच्या मनाची संभ्रमीत अवस्था झाली आहे. नागरिकांच्या शंका दूर करण्यासाठी राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने सामान्य: विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांची नियमावली जारी केली आहे.

लॉकडाऊनदरम्यान काय राहणार सुरु?

अत्यावश्यक सुविधा पुरवणारी सर्व दुकानं, राज्यातील सर्व अत्यावश्यक सेवा- मेडिकल, दुध, किराणा फळं आणि भाज्या, कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोना संसर्ग रोखण्याचे सर्व नियम पाळून सुरू राहील. नियमांचं पालन होत नसेल तर राज्य सरकारच्या परवानगीने स्थानिक प्रशासन निर्णय घेऊ शकतं,  सार्वजनिक वाहतूकीच्या दृष्टीने गॅरेज खुली, बस, लोकल ट्रेन, टॅक्सी, अत्यावश्यक सेवेतील केंद्रीय कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी, दारू बारमधून विकत घेता येईल. किंवा नियमांप्रमाणे होम डिलिव्हरी मागवता येईल. रोडच्या बाजूला असलेले धाबे सुरू रहातील. पण, बसून जेवता येणार नाही. पार्सल डिलिव्हरीला परवानगी. आपले सरकार सेवा केंद्र, पासपोर्ट ऑफिस सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत खुले राहतील. स्थानिक प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे बार, रेस्टॉरंट सुरू रहातील. पण, हॉटेलमध्ये बसून जेवता येणार नाही. ग्राहक सोमवार ते शुक्रवार ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये स्वत: हॉटेलमध्ये जाऊन पार्सल विकत घेऊ शकतात. हॉटेल, रेस्टॉरंटमधून होम डिलिव्हरी संध्याकाळी 8 वाजल्यानंतरही सुरू असेल.

लॉकडाऊनदरम्यान काय बंद?

बांधकाम सामुग्रीची दुकानं, गाड्यांच्या पार्टची दुकान बंद, केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत धरलं जाणार नाही, दारूची दुकानं बंद रहातील,  इलेक्ट्रॉनिक वस्तू एसी, कूलर, फ्रीज यांच्या दुरूस्तीची दुकानं, फोन, लॅपटॉपची दुकानं, विकेंड किंवा सोमवार के शुक्रवार संध्याकाळी 8 नंतर ग्राहक पार्सल घेऊ शकत नाहीत, सर्व मॉल, थिएटर्स सक्तीने बंद ठेवण्यात येणार आहेत.

- Advertisment -

Most Popular