28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeMaharashtra Newsशिमगोत्सवावर कोरोनाचे संकट

शिमगोत्सवावर कोरोनाचे संकट

कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता, या पार्श्वभूमीवर अगदी मागील वर्षीच्या मार्चपासून अनेक उत्सवांना गालबोट लागले आहे. कोकणामध्ये गणपती आणि शिमग्याच्या उत्सवावर, त्यावेळी खेळवल्या जाणार्या पालखी सणावरदेखील कोरोनाचं संकट ओढवलेलं आहे. कोकणात जाणारया चाकरमान्यांनी गावाला जाण्याआधी कोरोनाचे निर्बंधित करून दिलेले नियम पाळणे अत्यावश्यक आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चाकरमन्यांनी कोकणात येऊ नये, असे आवाहनचं रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे. असे असूनही शिमग्याला येणाऱ्या चाकरमान्यांनी कोरोन निर्बंधासाठी केलेले नियम पाळणे अनिवार्य आहे. जे लोक कंटेन्मेंट झोनमधून येणार आहेत त्या चाकरमान्यांसाठी कोरोना टेस्ट बंधनकारक केली गेली आहे.त्यांना जिल्ह्यात येण्यापूर्वी 72 तास आधीचा कोरोना चाचणी अहवाल सदर करणे बंधनकारक केले आहे. तसेच तळकोकणात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोनाच संकट घोंघावत असल्याने शिमगोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याचे प्रशासनाने आदेश दिले आहेत. मुंबई, पुण्यासारख्या हॉटस्पॉट असलेल्या किंवा परजिल्ह्यातून येणाऱ्या चाकरमान्याना गावात प्रवेश मिळण्यासाठी कोरोना रिपोर्ट आणणे बंधनकारक केले आहे. होळीसाठी जे चाकरमानी कोकणात आगमन करणार आहेत त्यांची कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह असणं गरजेचे असून वरील रिपोर्ट हा किमान 72 तासापूर्वीचा असणे आवश्यक आहे. जर रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच चाकरमान्यांना गावामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. कोरोनाचे वाढते संकट पाहता सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी सुरक्षितेसाठी आदेश जारी केले आहेत.

kokan palkhi event

कोकणामध्ये गणपती आणि होळी हे दोन मोठे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. कोकणातील गावांगावांमध्ये होळीच्या सणाला ग्रामदेवतेच्या पालख्या, रोंबाट, गोमुचे नाच असे एक ना एनेक प्रकारचे पारंपारिक खेळ केले जातात. मुंबई, पुणे या शहरातून लोक शिमगोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कोकणात गावी हजेरी लावतात. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रशासनाने चाकरमान्याना चक्क गावी न येण्याचे आवाहन केलं आहे. 50 लोकांच्या उपस्थितचं सण साजरे करावेत असे आदेश जरी केलेलं असून, ग्रामनियंत्रण समितीने ५०लोकांपेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे आदेशाद्वारे सुचविले आहेत. तसेच आदेशाचे उल्लंघन केले गेल्यास आणि कोरोनाचे  प्रमाण वाढले तर तो पुर्ण भाग  प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येइल.

मागच्या वर्षी पालखी उत्सवावर बंदीच घालण्यात आली होती. परंतु, यावर्षी पालखी उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आदेश आहेत. गणपती नंतर आत्ता कोकोनातील प्रसिद्ध असलेल्या शिमागोत्सावावरही कोरोनाचं संकट घोंघावत आहे. यंदाही कोकणामध्ये शिमगोत्सवात अशीच तुफान गर्दी उसळण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासन आतापासूनच खबरदारी घेण्यासाठी सज्ज झाले आहे. परंतु जरी पालखी उत्सवाला परवानगी दिली असली तरी त्यावरही बरेच निर्बंध लादले गेले आहेत.  पालखी घरोघरी न नेता फक्त ठरलेल्या ठिकाणाहून ग्राम प्रदक्षिणा घालून पुन्हा मंदिरात आणली जाणार आहे. कोणाच्याही घरी नेण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच गावांमध्ये रात्री ग्रामदेवतेच्या पालख्या नाचवल्या जातात, तसेच गावात गोमू, नमन, खेळे या कार्यक्रमांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचे गावामध्येही स्कॅनिंग केले जाऊन मगच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे ग्राम नियंत्रण समितीकडे शिमगोत्सवाच्या काळात जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या लोकांच्या तपासणीचे  सत्र सोपवण्यात आली आहे. एखाद्यामध्ये कोरोनाची लक्षण जाणवत असल्याल्यास त्याला शिमगोत्सवामध्ये सहभागी होता येणार नाही असा दक्षता आदेश ग्राम नियंत्रण समितीकडे सोपविण्यात आला आहे.

- Advertisment -

Most Popular