27 C
Mumbai
Thursday, September 12, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...
HomeEntertainmentप्रियांका चोप्रा झाली हॉटेल व्यवसायिक

प्रियांका चोप्रा झाली हॉटेल व्यवसायिक

प्रियांका चोप्रा हिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. न्यूयॉर्कमध्ये तिने सोना रेस्तराँ सुरू केले आहे. प्रियांकाने सांगितले कि, आम्ही सोना असे नवीन रेस्तराँ सुरु केले असून या महिन्याच्या शेवटी ते सुरु करण्यात येईल. प्रियांकाने नवीन रेस्तराँचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्रियांका आणि तिचा पती निक पूजा करताना दिसत आहेत. प्रियांकाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, भारतीय पदार्थांची चव या रेस्तराँमध्ये लोकांना घेता येणार आहे. मी सोनाला तुमच्या समोर सादर करण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. ज्या भारतीय पदार्थांची चव मी लहानपणापासून घेत मोठी झाले, येथील लोकांना  ती चव अनुभवायला मिळणार आहे. माझ्या या रेस्तराँचे किचनची जबाबदारी शेफ हरी नायक हे सांभाळणार आहेत. शेफ हरी नायक हे अतिशय हुशार असून त्यांनी अतिशय चविष्ठ आणि इनोव्हेटिव्ह पदार्थांचा मेन्यू रेस्तराँसाठी तयार केला आहे. हे सर्व पाहून मी खूप अत्यानंदित झाली आहे, असे प्रियांकाने सांगितले.  पुढे सांगताना प्रियांका म्हणाली,  ‘या महिन्याच्या अखेरीस लोकांसाठी रेस्तराँ सुरु होईल. तुम्हा सर्वांना मी माझ्या रेस्तराँमध्ये भेटण्यास आतूर झाले आहे. माझे मित्र मनीष गोयल आणि डेविड रेबिन यांच्या अमूल्य मार्गदर्शनाने माझा हा रेस्तराँ प्रयत्न यशस्वी झाला आहे. माझ्या ड्रीम व्हिजनवर काम करण्यारया माझ्या संपूर्ण टीम आणि डिझायनर मेलिसा बॉवर्स यांची मी आभारी आहे. प्रियांकाने  अशा प्रकारची पोस्ट केली आहे.

priyanka chopra becomes hotel owner

प्रियांकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती, हॉलिवूड मधील दोन चित्रपटांत लवकरच झळकणार आहे. ‘टेक्स्ट फॉर यू’ आणि ‘मॅट्रिक्स 4’ असे तिच्या आगामी चित्रपटांची नावे आहेत. ‘टेक्स्ट फॉर यू’ मध्ये प्रियांका सोबत सॅम ह्यूगन आणि सेलिन डायन हे प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. तर दुसरीकडे, प्रियांकाची मुख्य भूमिका असलेला ‘मॅट्रिक्स 4’ हा चित्रपटामध्ये असून तिच्यासोबत कियानू रीव्स, कॅरी-एन्नी मॉस आणि नील पॅट्रिक हॅरिस हे सहकलाकारही नजरेस येणार आहेत. प्रियांकाच्या अभिनय व्यतिरिक्त अन्य व्यवसाया बद्दल सांगायचे तर ती चित्रपटांची निर्मिती सुद्धा करते. प्रियांकाचे ‘पर्पल पेबल्स पिक्चर्स’ नावाचे प्रॉडक्शन हाऊस आहे. या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत तिने ‘व्हेंटिलेटर’, ‘सर्वन’, ‘पाहूना’, ‘फायरबँड’, ‘पानी’, ’द स्काई इज पिंक’, ‘द व्हाइट टायगर’, यासारखे एका पेक्षा एक असे उत्तम चित्रपट बनवले आहेत. प्रियांकाने चित्रपट प्रॉडक्शनशिवाय काही दिवसांपूर्वीच तिचा अनोमली नावाचा हेअर ब्रँड देखील प्रदर्शित केला आहे. याशिवाय मागील महिन्यांमध्ये तिचे ‘अनफिनिश्ड’  हे तिच्या जीवनावर आधारित पुस्तकही प्रकाशित झाले आहे.

प्रियांका प्रमाणेच अनेक बॉलीवूड तारका सुद्धा अभिनयाशिवाय इतर क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण चित्रपटां शिवाय कपड्यांच्या ब्रँड ऑल अबाउट यू यामधून चांगली कमाई करते आहे. हे एक ऑनलाइन क्लोदिंग स्टोअर असून, त्याची सुरूवात 2015 मध्ये अभिनेत्री दीपिकाने मिंत्रासोबत केलेली. 2013 मध्ये दीपिकाने महिलांसाठी वान हुसैनसह मिळून एक फॅशन ब्रँडसुद्धा सुरू केला होता.

शिल्पा शेट्टी बर्‍याच वर्षांपासून चित्रपटां पासून दूर असून ती रेस्तराँ, स्पा आणि बारचा व्यवसाय चालवतेय. तसेच शिल्पा आयपीएल टीम राजस्थान रॉयल्सची ओनर आहे. त्याचप्रमाणे शिल्पाने बेस्टियन चेन नावाचे एक नवीन रेस्तराँ मुंबईतील वरळी भागात काही महिन्यांपूर्वी सुरू केले आहे. या हॉस्पिटॅलिटी व्यवसायातून शिल्पा कोट्यवधींची कमाई करते आहे.

आलिया भट्टने 2013 साला मध्ये स्टाईल क्रॅकर नावाचे एक स्टार्टअप सुरू केले. ती चित्रपटांसह स्टार्टअप मध्येही गुंतवणूक करण्यात सातत्य ठेवत आहे. यामध्ये लोकांना स्टाईलिश बनवण्याचे काम आलियाची टीम करते. याशिवाय आलियाने एड-ए-मम्मा नावाची स्वतःची कंपनी 2020 साली सुरू केली आहे. हा एक किड फॅशन ब्रँड असून तेथे 4 ते 12 वर्षे या वयोगटातील मुलांचे कपडे मिळतात.

इतरही बर्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी विविध क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे.

- Advertisment -

Most Popular