32 C
Mumbai
Friday, May 24, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeDevotionनिर्बंधित महाशिवरात्री

निर्बंधित महाशिवरात्री

आज महाशिवरात्री निमित्त आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्या देवळांमध्ये निर्बंध घातले गेले आहेत. औंढा नागनाथ येथील महाशिवरात्री उत्सव जगभरामध्ये  सुपरिचित आहे. बारा ज्योतिर्लिंगा पैकी आठवे आणि अतिशय प्रसिद्ध तसेच महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील महाशिवरात्री उत्सव यंदा इतिहासात पहिल्यांदाच भक्तांविना साजरा केला जातो आहे. दरवर्षी महाशिवरात्री उत्सवाला मंदिर परिसरामध्ये नागनाथाची रथपरिक्रमा घालण्यात येते आणि त्या उत्सवाला देशभरातून विविध ठिकाणाहून भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावतात मात्र यंदाच्या वर्षी उद्भवलेल्या कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी रात्री साडेबारा वाजता आमदार संतोष बांगर, तहसीलदार कृष्णा कानगुले आणि विस्वस्थ ऍड. राजेश पतंगे या तिघांनी सपत्नीक महापुजा करून त्यानंतर पुन्हा मंदिर बंद करण्यात आले. पोलिसांनी मंदिर परिसरात सगळीकडे बारिकेट लावण्यात आले आहेत. तसेच औंढा शहरामध्येही सर्वत्र पोलिसफाटा मागवून बंदोबस्त करण्यात आला आहे त्यामुळे दरवर्षी ज्या नागनाथ मंदिरामध्ये आजच्या दिवशी हलाय्लाही जागा नसते तिथं पूर्णत: शुकशुकाट बघायला मिळत आहे.

mahashivratri

त्याचप्रमाणे ठाण्यातील अंबरनाथ येथे सुमारे 900 वर्ष असलेले पुरातन शिव मंदिर जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे . दरवर्षी हजारो भाविक महाशिवरात्री निमित्त या मंदिरात दर्शनासाठी येतात. मंदीर परिसरामध्ये महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने जत्रा भरवली जाते. यंदा राज्यात कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेवून महाशिवरात्री उत्सवानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने यंदासाठी उत्सव रद्द केलेला असून, भाविकांनाही प्रवेश निशिब्द्ध केला गेला आहे. पोलीस आणि मंदिर प्रशासनाने मिळून घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. आज मंदिर परीसरात फक्त पोलीसांची वर्दळ दिसून येत असून, मंदिर आवारात पूर्णपणे शांतात दिसत आहे. मंदिराच्या अंतर्गत गर्भगृहात सजावट आणि विद्युत रोषणाईनं परिसर उजळला गेला होता.

आज महाशिवरात्रीच्या औचीत्याने पुण्यामधील प्रसिद्ध श्री दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात येथे 51 किलो चक्क्यापासून शंकराची पिंडी तयार करण्यात आलेली आहे. गेली ६ वर्ष अशा पद्धतीने पिंडी बनविण्याचे कार्य करत आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संसर्गामुळे पुण्यातील मंदिरं भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. तर काही मंदिरांमध्ये भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

shiv shankar mahashivratri

महाशिवरात्रीच्या निमित्ताने साताऱ्यामधील क्षेत्रमाहुली येथे श्री रामेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे गावातील रामेश्वर मंदीर, क्षेत्रमाहुली ग्रामंपचायत आणि  सरपंच गृप यांनी एक विशिष्ट उपक्रम राबवून मंदिर परिसरात भाविकांना बंदी असली तरी घरबसल्या शंभू महादेवाचे दर्शन व्हावे यासाठी प्रयत्न केला आहे. मंदिराला केलेल्या विद्युत रोषणाईमुळे डोळे दिपतातच परंतु, मंदिराचे कृष्णा नदीतील प्रतिबिंब हे मात्र आणखीनच आकर्षक दिसते. या मंदीराची स्थापना 1703 साली केली असून अजूनही या मंदिराची स्थापत्य रचना सुस्थितीत आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर वाढता संसर्ग रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी महाशिवरात्रीची यात्राही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिरही दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.  मंदिर बंद ठेवण्यात आले असल्याने शिवभक्त, भाविक मंदिर पायऱ्यांचे दर्शन घेऊन समाधानी होत असत, परंतु, यावर्षी मात्र पायरीचे दर्शनही बंद केले गेले आहे. तसेच भाविकांना प्रवेश नसल्याने वैद्यनाथ मंदिराकडे जाणारे सर्व मार्ग पोलिसांनी बॅरिकेटिंग करून बंद केले आहेत. तसेच भाविकांना अर्धा किमी दूरच रोखण्यात येत आहे.

पंढरपूर येथील भाविक अनंत नंदकुमार कटप यांनी आज महाशिवरात्री निमित्त विठ्ठल रुक्मिणी  गाभाऱ्यासह मंदिराला शेवंती व बेलपत्राच्या साहाय्याने अतिशय कल्पक डोक्याने सजविण्याची सेवा केली आहे. शंकराला पांढरी फुल आणि बेलपत्र प्रिय आहे म्हणून त्यांनी सजावटीसाठी शेवंती व बेलपत्राचा आकर्षक रित्या वापर करून बारा ज्योतिर्लिंगाच्याही प्रतिमा अत्यंत सुबकरीत्या फुल सजावटीने मांडण्यात आल्या आहेत. विठ्ठल मंदिरात महाशिवरात्री लाही एकादशी प्रमाणेच वारकरी संप्रदायात अत्यंत महत्वाचे मानले जाते. दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो परंतु, यंदाच्या  कोरोनाच्या सावटामुळे केवळ फुलांची आरास करीत धार्मिक परंपरा साजऱ्या केल्या जाणार आहेत .

- Advertisment -

Most Popular