26 C
Mumbai
Monday, August 8, 2022

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....

मध्य रेल्वे मुंबई भरती २०२२

मध्य रेल्वे मुंबई येथे रिक्त पदांची भरती...
HomeTech Newsपबजीची नवीन नावाने भारतात एन्ट्री

पबजीची नवीन नावाने भारतात एन्ट्री

भारतामध्ये पबजी मोबाईल इंडिया लवकरच नवीन नावाने लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर कंपनीने या लॉन्चिंग सोबत या गेमचे अधिकृत नाव देखील बदलून आता बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया असे ठेवण्यात आले आहे. त्यांच्या अधिकृत फेसबुक आणि युट्युब चॅनलवर पबजी मोबाईल इंडिया यांनी त्या संबंधित पोस्ट सुद्धा शेअर केली आहे. भारतात बॅटल रॉयल गेम हा बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया नावाने लॉन्च होण्याची शक्यता आहे. मात्र हा गेम कधी लॉन्च करण्यात येणार त्या संबंधित अद्याप काही माहिती स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र लवकरच युजर्ससाठी हा गेम उपलब्ध करुन दिला जाईल अशी अपेक्षा करण्यात येत आहे.

गेल्या वर्षी पबजी मोबाईल गेमवर युजर्सच्या डेटा सुरक्षिततेला धोका पोहोचवल्याच्या कारणामुळे  भारतात बंदी घालण्यात आली. त्यानंतर पबजी मोबाइल डेव्हलपर्स यांनी असे जाहीर केले होते की, भारतासाठी स्वतंत्र असा पबजी मोबाइल इंडिया गेम लॉन्च करण्यात येईल. तर आता क्राफ्टॉन कंपनीकडून बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया हा पर्यायी गेम लॉन्च करण्यात येणार आहेत. यामागील मुख्ये कारण म्हणजे पबजी मोबाईल गेमवर भारतामध्ये बंदी घातल्यानंतर युजर्स आकर्षित होण्यासाठी नावामध्ये बदल करण्यात आला आहे.

pubg renames in india

 मागील आठवड्यामध्ये पबजी मोबाईल इंडियाकडून त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर गेम संबंधित एक टीझरही लॉन्च करण्यात आला होता. पण लाईव्ह झाल्यानंतर काही काळाने तो टीझर डिलीट करण्यात आलेला. त्या टीझरमध्ये गेम संबंधित काही प्रमाणातील माहिती असलेल्या गोष्टी आणि त्या गेमचे फिचर्सची झलक देण्यात आली होती. या शिवाय पबजी डेव्हलपर्स कडून कामासाठी भारतीय कर्मचाऱ्यांची सु्द्धा नेमणूक करण्यात आली आहे. कंपनीने त्यासंबंधित Linkdin वर त्यांच्या कंपनीकडे असलेल्या भरती संबंधित पोस्ट शेअर केली आहे. भारतामध्ये या गेमसाठी डेव्हलपर्सकडून $100 मिलियनची गुंतवणूक करणार असल्याची घोषणाही केली गेली आहे.

- Advertisment -

Most Popular