सर्कस म्हटलं कि सगळ्यांना आठवत ते लहानपणी काही ठराविक तास खुर्चीला खिळून राहून, मनसोक्त आनंद घेऊन एकत्र कुटुंबा सोबत पाहिलेली. त्यामधील सर्कसच्या कलाकारांनी सादर केलेल्या विविध कलागुण, त्यांचे रंगीत पोशाख, त्यांचे हावभाव, त्यांनी केलेल्या नकला, त्याचप्रमाणे पूर्वी वेगवेगळ्या प्राण्यांचा सुद्धा समावेश सर्कसमध्ये असायचा. प्राण्यांना योग्य ट्रेनिंग देऊन करवून घेतलेले वेगवेगळे आकर्षक कला प्रकार पाहायला मिळायचे, त्यामुळे प्राणी संग्रहालयामध्ये फक्त वेगवेगळे प्राणी बघणार्यांना सर्कस मधील प्राण्यांचे कला प्रयोग बघण्यास मिळू लागले. त्यामुळे साधारण हिंवाळा ऋतूच्या सुरुवातीला गावागावांमध्ये सर्कसीचे तंबू ठोकले जायचे. त्याआधी पोस्टर, भोंग्यावाली रिक्षा गावामध्ये फिरून सर्कसचा प्रचार करत असे. कालांतराने शासनाने सर्कस मध्ये प्राण्यानवर बंदी घातली. त्यामुळे काहीसा सर्कस बघायला जाण्याचा कल लोकांचा कमी झाला त्यामध्येचं कोरोना साथीमुळे जगभरामध्ये जसे थैमान घातले आहे त्याचा परिणाम इतर उद्योग व्यवसायांप्रमाणे हातावर पोट असणारा व्यवसाय सर्कसवर सुद्धा झाला आहे.
रेम्बो सर्कस हे जगप्रसिद्ध नाव सुद्धा या कोरोनाच्या विळख्यात अडकलेले गेले. सर्वत्र वाढत चाललेला कोरोनाचा संसर्ग पाहता विविध देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले ८ महिने सर्व देश लॉकडाऊन होता. त्यामुळे त्याचा दुष्परिणाम प्रत्येक व्यक्तीवर झालेला दिसला. जाणून घेऊया रेम्बो सर्कस आणि सर्कसच्या सदस्यांना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्कशीचे सगळे शो सध्या बंद आहेत. देशभर फिरून करमणूक करणाऱ्या सर्कशीकडे कोरोना संसर्गाच्या भीतीने लोकांनीही पाठ फिरवली आहे. त्यामुळे त्यांना सर्कशीच्या शो मुळे मिळणारे आर्थिक उत्पन्न बंद झाले. त्यामुळे सर्कसच्या महिला, पुरुष, लहान मुले यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. परंतु, रेम्बो सर्कसने यावर एक नामी युक्ती काढली आहे. भारतातील सर्वात मोठ्या सर्कशींपैकी एक असणाऱ्या रेम्बो सर्कसने आता ऑनलाईन शो सुरू केले आहेत.
They say laughter is the best medicine. But the ones who made you laugh have their smiles turned upside down. Bring back their lost smiles. Show your support to #RamboCircus #SaveTheCircus
— Rambo Circus (@RamboCircus_Ind) September 20, 2020
Watch the show online:https://t.co/EcGpE2aWQm pic.twitter.com/3LOl7lfgaB
डिजीटल प्लॅटफॉर्मवर आता सर्कसशीचे शो उपलब्ध झाले आहेत. जेणे करून आजच्या पिढीला सर्कस बद्दल माहिती होईलच त्याचप्रमाणे पालकानांही एका छताखाली बसून टेलीविजन अथवा कॉम्प्यूटरच्या आधारे ऑनलाईन सर्कस बघण्याचा आनंद घेता येणार आहे. सर्व जग डीजीटल होत असताना सर्कस व्यवसायाने सुद्धा त्यामध्ये घेतलेली उडी निश्चितच योग्य आहे, त्यामुळे घरबसल्या सर्कसचा आनंद घेता येतो आहे.