शहरी शाळांप्रमाणेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देखील इतर मुलांप्रमाणेच आपल्या घरात अथवा शाळेत बसून आकाशगंगा पाहायला मिळणार आहे. या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक दृष्टी व विज्ञान बद्दल जिज्ञासू वृत्ती जोपासली जाईल. सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी योजलेल्या या ‘विज्ञान विद्यार्थ्यांच्या दारी’ उपक्रमाचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कौतुक केलेआहे. आज नव्या अत्याधुनिक कल्पना पुढे येत आहेत व ग्रामीण भागातील खेड्यांतील तसेच वस्तीशाळामधील विद्यार्थी यांचा शिक्षणाचा दर्जा सुधारून त्यांची शिक्षण पद्धती प्रवाहात कशी राहील याचा विचार करणे गरजेचे आहे. ही शिक्षण क्षेत्रातील वैज्ञानिक क्रांती करण्याचे काम आजचे युवा नेतृत्व करत आहे याबद्दल शालेय शिक्षण मंत्री वर्षा मंत्री यांनी आमदार रोहित पवारांचे कौतुक केले.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज मुंबईमध्ये अंतराळाची व डिजिटल इंटरॅक्टिव क्लासरुम या प्रोजेक्टचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. कर्जत मधील जामखेड तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन या विषयात रुची निर्माण व्हावी या दूरदृष्टीने “सफर अंतराळाची”तसेच शालेय विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी डिजिटल इंटरॅक्टिव क्लासरुम तयार करण्यात आले आहेत. आमदार रोहित पवार यांच्या सुपीक डोक्यातून साकारलेल्या विज्ञान विद्यार्थ्यांच्या दारी या अंतराळ व डिजिटल इंटरॅक्टिव क्लासरुम या उपक्रमाची निर्मिती करण्यात यश आले. त्यानुसार, आता फिरते तारांगण व टेलिस्कोप हे कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे प्रत्येक शाळेमध्ये प्रदर्शित केल जाणार आहे. तारांगणमध्ये विद्यार्थ्यांना नेहरू तारांगण प्रमाणे अवकाशाबद्दल रंजक माहिती मिळणार आहे, त्याप्रमाणे टेलिस्कोप द्वारे प्रत्यक्ष ग्रह, तार्याचेही दर्शन घ्यायला मिळणार आहे. आपल्या अंतराळातील विविध गोष्टी जसे कि उपग्रह,तारे, आकाशगंगा, अंतराळामधील गूढ गोष्टी, अशा सगळ्या गोष्टींबाबत उत्कंठा निर्माण होउन भविष्यामध्ये करियर म्हणून विद्यार्थी हे क्षेत्र निवडतील, अशा स्पष्ट अपेक्षेने आपण सदर प्रोजेक्ट सुरू केलेला आहे.
या लोकार्पण कार्यक्रमा अंतर्गत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितल कि, शिक्षण क्षेत्रात काम करत असताना कोणताही राजकीय दृष्टीकोन न ठेवता विद्यार्थी व समाजाचे हित लक्षात ठेऊनचं आपल्याला एकत्रित पुढे जायचे आहे, असे केल्याने विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता चांगल्या प्रकारे साधली गेली पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अवघड पद्धत लक्षात येत नसेल तर ती सोप्या पद्धतीने करून त्याद्वारे अभ्यासक्रम समजावा. त्याचप्रमाणे देश डिजिटलायझेशनकडे वळत असल्याने प्रत्येकाने डिजिटल शिक्षण आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल इंटरॅक्टिव पॅनल देण्यात आले आहे. यापूर्वीही 200 शाळांमध्ये सदर पॅनल वितरीत केले असून उर्वरित 200 शाळांमध्ये आता वितरीत करण्यात येईल. या कार्यक्रमाप्रसंगी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.