27 C
Mumbai
Wednesday, September 11, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...
HomeMaharashtra Newsकार्तिकी एकादशीही आषाढी एकादशी प्रमाणेच प्रतीकात्मक पद्धतीने साजरी

कार्तिकी एकादशीही आषाढी एकादशी प्रमाणेच प्रतीकात्मक पद्धतीने साजरी

२०२० सालच्या सुरुवातीपासूनच कोरोना सारख्या महाभयंकर व्हायरसने अख्ख्या जगाला विळखा घातला आहे. त्यामध्ये जीवित हानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे गेले काही महिने फक्त कोरोना, लॉकडाऊन, कोरोना चा वाढता संसर्ग, त्यातून बरे झालेले अथवा मृत्यू पावलेले रुग्ण याच बाबतीतल्या बातम्या कानावर येत आहेत. सर्व सणही शांततेत पार पाडले. शासनाने ठरवून दिलेल्या नियमावली नुसार च नियोजन करून  सण साजरे केलेलं गेले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती, कारण होणारी गर्दी आणि त्यामुळे वाढणारा संसर्ग या गोष्टी टाळण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर करून, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, कॉलेज, चित्रपट गृह, धार्मिक स्थळे यांवर बंदी घातली. त्याचप्रमाणे कोरोना चा प्रभाव सणांवर सुद्धा दिसून आला. होळी, शिमग्या पासून सुरु झालेल्या कोरोनाचा दिवाळी पर्यंत प्रभाव काही प्रमाणात कमी झाला. परंतु या दरम्यान आलेले लहान मोठे सण हे जसे कि होळी, आषाढी एकादशी, गणेशोत्सव, दिवाळी हे सण सरकारच्या आखून दिलेल्या नियमावली प्रमाणेच साजरे करावे लागले.

kartiki ekadashi

२४ नोव्हेंबर येणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रा सुद्धा आषाढी एकादशी प्रमाणेचं प्रतीकात्मक पद्धतीने करावी असा प्रस्ताव सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी राज्य सरकारला केला आहे. कोरोनाचा प्रभाव पाहता बाहेरून येणाऱ्या कोणत्याही दिंड्यांना आणि पालख्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश देऊ नये, परंतु काही वारकरी संघटनेच्या प्रमुखांनी याला विरोध दर्शवला आहे. विविध भागातून येणाऱ्या दिंड्या, पालख्या आणि पालख्यांबरोबर साधारण ५ ते ६ लाखापर्यंत लोकं पंढरपूरामध्ये दरवर्षी येतात, परंतु आता उद्भवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली तर कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळेच आषाढी एकादशीप्रमाणेच फक्त प्रतीकात्मक पद्धतीने थोडक्यात साजरी व्हावी असा प्रस्ताव सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी राज्य सरकारला केला आहे. यासाठी काही वारकरी संघटनानी प्रतिनिधींनी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली असता, त्यांनी मर्यादित वारक-यांच्या उपस्थिती मध्येचं कार्तिकी एकादशी साजरी करण्याचा आदेश दिला आहे. आषाढी एकादशीला आपण जशी नियमावली आखून खबरदारी घेतलेली त्याचप्रमाणे कार्तिकी एकादशीलाही घेणे जरुरीचे आहे, जेणेकरून कोरोनाचा प्रभाव वाढणार नाही.

- Advertisment -

Most Popular