27 C
Mumbai
Wednesday, July 6, 2022

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....

मध्य रेल्वे मुंबई भरती २०२२

मध्य रेल्वे मुंबई येथे रिक्त पदांची भरती...
HomeEntertainmentमनोरंजन क्षेत्रासाठी विशेष नियमावली जाहीर

मनोरंजन क्षेत्रासाठी विशेष नियमावली जाहीर

शुटींगच्या ठिकाणी कमीत कमी लोकांमध्ये शूटिंग केले जावे, ज्यामध्ये मॉब म्हणजेच गर्दी होईल असे सीन सद्य स्थितीला टाळावे आणि दाट लोकवस्तीत शूटिंग करण्यास परवानगी मिळू शकत नाही, महामंडळाने अशा सूचना निर्मात्यांना आणि सर्व टीमला दिल्या आहेत.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात येणाऱ्या शूटिंगबाबत नियमावली जारी केली आहे. शुटींगच्या ठिकाणी कमीत कमी लोकांमध्ये शूटिंग केले जावे, ज्यामध्ये मॉब म्हणजेच गर्दी होईल असे सीन सद्य स्थितीला टाळावे आणि दाट लोकवस्तीत शूटिंग करण्यास परवानगी मिळू शकत नाही, महामंडळाने अशा सूचना निर्मात्यांना आणि सर्व टीमला दिल्या आहेत.

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातील विविध महामंडळाचे सदस्य, युनियन आणि कलाकारांची व्हिडीयो कॉल वर व्हर्चुअल बैठक पार पडली. निर्मात्यांनी सर्व प्रकारची खबरदारी घेतली आणि शासनाने दिलेली नियमावलीचे पालन केले तर यावेळी शूटिंग बंद करण्याची वेळ येणार नाही. अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. याला अनुसरून महामंडळाने ही नियमावली जाहीर केली आहे. मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांचे शूटिंगला परवानगी दिल्याबद्दल चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी आभार व्यक्त केले आहेत.

कोरोनाचा प्रभाव वाढतच चालल्याने प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे जरुरीचे आहे. गर्दीच्या ठिकाणी शुटींग न करता इनडोअर, आऊटडोअर स्टुडिओ किंवा जिथे गर्दी होणार नाही अशा शहराबाहेरील रिसॉर्ट, बंगल्यांमध्ये कायदेशीर परवानगी घेऊनच शूटिंग करा तसेच शूटिंगची जागा सोडून काम सुरू असताना इतरत्र कुठेही भटकू नये, सेटवर कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने आणि विविध ठिकाणाहून लोक येत असल्याने वारंवार सेट सॅनिटाइज करा, सेटवर सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, टेंपरेचर गन असणे अत्यावश्यक आहे, ज्या व्यक्ती हॉटस्पॉट झोनमधून ये-जा करत असतील अशा व्यक्तींना शूटिंगसाठी काही दिवस बोलावू नका व सर्व कामगारांना काम मिळावे म्हणून त्यांना रोटेशन पद्धतीने बोलावण्यात यावे अशा सूचना नियमावलीत नमूद केल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन घेतलेल्या मिटिंगमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्यासह दिग्दर्शक, कलावंत यांचा सहभाग होता. यावेळी शूटिंग बंद केले जाणार नाही याची ग्वाही जरी त्यांनी दिली असली तरी शासनाने आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. सोबतच शूटिंग वेळी योग्य ती विशेष खबरदारी घेण्याची जबाबदारी सर्व निर्मात्यांनी घेतली पाहिजे व त्यावर संबंधित विविध संघटनांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले आहे. शुटींग संबंधीची नियमावली नुकतीच जाहिर करण्यात आलेली आहे व निर्माते, कलावंत, तंत्रज्ञ, कामगार व संबंधित चित्रपट क्षेत्राचे विविध सेवा पुरवठादार यांच्यासाठी ही नियमावली लागू ठरणार आहे. तसेच वेळोवेळी सेटवर पाहणी करण्यासाठी येणाऱ्या अ.भा.म.चि.म.च्या सदस्याना योग्य सहकार्य करावे. लक्षात असू द्या तुमचा एखादा हलगर्जीपणा चित्रीकरण पूर्णत: बंद करण्यासाठी व राज्य पुन्हा दुसर्या लॉकडाऊनच्या दिशेने जाण्यासाठी कारणीभूत ठरु शकतो.

- Advertisment -

Most Popular