भारतामध्ये लसीकरणासाठी मंजुरी मिळालेली तिसरी कोरोनावरील लस म्हणजे रशियाची स्पुतनिक व्ही ही आहे. ही लस रुग्णांवर 91.6 टक्के परिणामकारक असून, डॉ. रेड्डीजने हैदराबादमध्ये आज पहिला डोस दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. डॉ. रेड्डीजने रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडद्वारे रशियासोबत करार केलेला आहे. यानुसार भारतातचं या लसीचे उत्पादन केले जाणार आहे. रशियामध्ये उत्पादित केलेल्या स्पुतनिक-व्ही या लसीची भारतातील किंमत जाहीर करण्यात आली आहे. या लसीची भारतात किंमत 948 रुपये असून, त्यावर 5 टक्के जीएसटी आकारण्यात आली आहे. ही माहिती भारतात स्पुतनिक लस आयात करणारी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने दिली आहे. तसेच सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीजकडून या डोसला आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, रशियातून आयात केलेल्या या स्पुतनिक व्ही लसीची किंमत प्रति डोस 948 रुपये असून अधिक ५% जीएसटीमुळे या लसीची किंमत एकूण 995.4 रुपये एवढी होत आहे. एक डोस कमीतकमी 1000 रुपयांपर्यंत उपलब्ध होणार असल्याचे समजते. स्टॉक एक्सचेंजला स्पुतनिक-व्हि लसीच्या डोसच्या किंमतीबाबत डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने माहिती दिली असून, या लसीचेही दोन डोस घेणं बंधनकारक आहेत. या कंपनीच्या लसीच्या एका डोसची किमत 948 रुपये इतकी आहे. त्यावर पाच टक्के जीएसटी लागू होणार असल्याने या लसीच्या एका डोससाठी हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
शुक्रवारी रेड्डीज लॅबने हैदराबादमधील एका व्यक्तीला या व्हॅक्सिनच्या लॉन्चिंगच्या वेळी या लसीचा पहिला डोस दिला आहे. या लसीची पहिला स्लॉट 1 मे रोजी भारतात आली असून, तसेच 13 मे रोजी या लसीला सेंट्रल ड्रग्स रेग्युलेटरीने परवानगी दिली असून, या लसीचा आणखी एक स्लॉट आयात करणार असून त्यानंतर या लसीचे जून महिन्यापासूनपासून भारतातच उत्पादन घेतले जाणार आहे. भारतामध्येच ही लसनिर्मिती केल्यास त्याची किंमत आपोआप कमी होईल. भारतात या लसीच्या निर्मिती बाबत सहा लसी तयार करणाऱ्या भारतीय कंपन्यांशी चर्चा सुरू करण्यात आलेली आहे. दरम्यान, देशात डिसेंबरपर्यंत कोविड व्हॅक्सिनेच 200 कोटीहून अधिक डोस भारताला उपलब्ध होतील अशी माहिती निती आयोगाच्या एका सदस्याने दिली आहे. नीती आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी पुढील आठवड्यापासून भारतात स्पुटनिक-व्ही लस मिळणार असल्याची माहिती दिली आहे. भारतामध्ये स्पुटनिक व्ही लसीचा पहिला स्लॉट दाखल झाला असून दुसरा स्लॉट आज शुक्रवारी दाखल होणार असून, लवकरच या लसीची विक्री सुरु होईल, असं पॉल यांनी सांगितलं.