29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeIndia Newsलडाख चीनचा भूभाग असल्याचा नकाशात दाखविल्याबद्दल ट्वीटरवर नाराजी

लडाख चीनचा भूभाग असल्याचा नकाशात दाखविल्याबद्दल ट्वीटरवर नाराजी

चुकीचा नकाशा दाखवल्याबद्दल २२ ऑक्टोबर रोजी भारत सरकारने ट्वीटरला नोटीस बजावली होती.

लडाख हा चीनचा भूभाग आहे असे दाखवणाऱ्या नकाशाबद्दल सर्व स्तरातून ट्वीटर वर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्याचप्रमाणे लडाखच्या मुद्द्यावरुन ट्वीटरने दिलेले स्पष्टीकरण हे अपुरे आहे व या उत्तरांनी समितीचे समाधान झाले नाही त्यामुळे या कंपनीवर फौजदारी गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो. या गुन्ह्यासाठी सात वर्षाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे असे संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षा मिनाक्षी लेखी यांनी सांगितले आहे. भारताच्या नकाशाला चुकीच्या पध्दतीने प्रदर्शित केल्यामुळे २२ ऑक्टोबरला केंद्र सरकारने ट्वीटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोरसे यांच्याकडे एका पत्राद्वारे निषेध व्यक्त केला आहे. त्यात म्हटले होते की ट्वीटरने अशा पध्दतीने नकाशामध्ये छेडछाड करुन भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि अखंडतेचा अनादर केला आहे. त्याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञान खात्याच्या सचिवांनी याबाबत ट्विटरला लिहलेल्या निषेधाच्या पत्रात म्हटले आहे की, लडाखला चीनचा भाग दाखवल्याने ट्वीटरबद्दल केवळ अविश्वास वाढत आहे. ट्वीटरने याबद्दल भारतीयांच्या संवेदनांचा आदर करायलाचं हवा.

india china ladakh dispute

मीनाक्षी लेखी यांच्या अध्यक्षते खालील समितीसमोर हजर असताना ट्वीटर इंडियाने माफी मागितली होती. परंतु हे संसदीय समितीच्या वतीने सांगण्यात आले की, हे एक गुन्हेगारी कृत्य असल्याने देशाच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे ट्वीटर इंडिया नव्हे तर ट्वीटर इंडिया द्वारे प्रतिज्ञापत्र दिले पाहिजे. ट्वीटरच्या वतीने वरिष्ठ व्यवस्थापक शगुफ्त कामरान, कायदेशीर सल्लागार आयुषी कपूर, पॉलिसी कम्युनिकेशनच्या पल्लवी वालिया आणि कार्पोरेट सिक्युरिटीचे मानविंदर बाली हे अधिकारी या संसदीय समितीसमोर उपस्थित राहीले. तर संसदीय समितीच्या सदस्यासोबत माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय, आणि कायदा व न्याय मंत्रालयाचे अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. लडाखला चीनचा भाग असल्याचे सांगून आता ट्वीटरने प्रतिज्ञापत्रात लेखी दिलगिरी व्यक्त केली असल्याचे मीनाक्षी लेखी यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे त्या पुढे म्हणाल्या कि सर्व भारतीयांच्या भावना दुखावल्यामुळे ट्वीटरने माफी मागितली असून ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत चूक दुरुस्त करण्याची शपथही घेतली आहे. चुकीचा नकाशा दाखवल्याबद्दल २२ ऑक्टोबर रोजी भारत सरकारने ट्वीटरला नोटीस बजावली होती. कडक शब्दात, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय साहनी यांच्या वतीने ट्वीटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्जी यांना देशाच्या संवेदनशीलतेचा आदर करण्यास सांगितले होते.

- Advertisment -

Most Popular