26 C
Mumbai
Monday, August 8, 2022

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....

मध्य रेल्वे मुंबई भरती २०२२

मध्य रेल्वे मुंबई येथे रिक्त पदांची भरती...
HomeIndia Newsहॅशटॅग महाकोव्हिड

हॅशटॅग महाकोव्हिड

जग सध्या कोरोनाची परिस्थितीपुढे हतबल होताना दिसत आहे. कोरोनाचा संक्रमित झाल्यानंतर अनेक रुग्णांना रुग्णालयात बेडही उपलब्ध होत नाही आहेत. तर काही ठिकाणी ऑक्सिजनचाही तुटवडा आहे. मुंबई सारख्या ठिकाणी जी महत्वाची रुग्णालयं आहेत तिथे बेड उपलब्ध नसतील तर पुढे काय करायचे असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांसमोर आ वावून उभा आहे. पण अशावेळी मुंबई आणि उपनगरात जी छोटी रुग्णालयं आहेत तिथे काही बेड उपलब्ध आहेत, परंतु, वेळीच त्याची माहिती मिळते असं नाही. अशांसाठी मराठी कलाकार मदतीसाठी सरसावले आहेत. ही बाब डोळ्यासमोर ठेवून मराठी कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमाने एक नवी मोहीमेला सुरू केली आहे.

सध्या ट्विटरवर #mahacovid हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. मराठी कलाकारांनी या नव्या मोहिमेला महाकोव्हिड असे नाव दिले आहे. महा म्हणजे महाराष्ट्र या शब्दाचे लहान रूप म्हणजेच शोर्ट कट आणि कोव्हिड म्हणजे कोरोना. कोरोना संदर्भात बेड, प्लाझ्मा, औषधं, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सह कोणत्याही गोष्टी मिळण्यात तुम्हाला वा तुमच्या नातेवाईक, मित्र मैत्रीणीना काही अडचण येत असेल तर आपली गरज #mahacovid या हॅशटॅगसह जोडायला विसरू नका. असं आवाहन केले आहे.

स्वप्नील जोशीने या सर्व मोहिमेबाबत बोलताना इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात आता यापुढचे काही दिवस तो आपल्या सोशल मीडियावर फोटो वा इतर बातम्या पोस्ट न करता केवळ कोव्हिडबाबतची सकारात्मक बातमी वा त्याबद्दलच्या मदती संबंधीच्या बातम्या पोस्ट करणार आहे असं त्यानं स्पष्ट केले  आहे. त्याप्रकारे त्याने ट्विटही केलं आहे. त्याचाच भाग म्हणून महाकोव्हिड हा हॅशटॅग वापरून जेवढी माहिती लोकांपर्यंत पोचवता येईल ती तो पोचवण्याचं काम करतो आहे आणि पुढेही करत राहील.

तसेच स्वप्नील बरोबर मराठी मनोरंजन सृष्टीतल्या अनेक कलाकारांनी सुद्धा असे आवाहन केलं आहे. यामध्ये समीर विद्वांस, हेमंत ढोमे, सोनाली कुलकर्णी, गायत्री दातार इत्यादी अनेक कलाकारांनी आवाहन केले आहे. कलाकारांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसादही उत्तम प्रकारे मिळू लागला आहे. तसेच स्थलपुराण, त्रिज्या या चित्रपटाचा दिग्दर्शक अक्षय इंडिकरने स्वप्नील आणि सोनालीला टॅग करून बेड उपलब्ध असलेल्या रुग्णालयाचा पत्ता पोस्ट केला आहे. त्याला या कलाकारांनी लाईक करून प्रतिसाद दिला आहे. स्वप्नीलने यामध्ये वारंवार #mahacovid हॅशटॅग प्रमोट केला आहे. त्याला प्रतिसादही मिळू लागला आहे. जिथे जी गरज आहे, ती स्वप्नील रिट्विट करून सांगताना दिसतो आहे. आनंदी गोपाळ, डबलसीट आदी चित्रपटांचा दिग्दर्शक समीर विद्वांस यानेही कोव्हिड संदर्भातल्या काही गोष्टी पोस्ट केल्या आहेत. यात आता 18 वर्षावरील नागरिकांना कोव्हिडची लस मोफत मिळणार असल्याच्या बातमीला रिट्विट करताना समीर म्हणतो, की मला ही लस विकत घेणं शक्य आहे. ज्या लोकांना ही लस घेण शक्य आहे त्यांनी ती मोफत न घेता विकत घ्यावी, जेणेकरून त्याचा पैसा कोव्हिड संबंधीतील इतर कारणासाठी वापरता येईल. असे अनेक कलाकार आपल्या परिने कोव्हिडच्या भयानक स्थितीवर मात करण्यासाठी पुढे सरसावताना दिसून येत आहेत.

- Advertisment -

Most Popular