भारतात सध्या प्रेक्षकाविना आयपीएल सामने सुरु आहेत. आयपीएलच्या सूत्रांकडून एक बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा गोलंदाज आणि भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन आयपीएल 2021 च्या उरलेल्या सामन्यांमधून माघार घेत आहे.अश्विनचे कुटुंब सध्या कोरोनाच्या विळख्यात अडकले असून हलाखीच्या परिस्थितीतून जात आहे. कोरोनाने सर्वच जगाचे होत्याचं नव्हतं केलं आहे. माझं कुटुंबसुद्धा सध्या कोरोनाशी लढा देत असल्याने अशावेळी मी त्यांच्या सोबत असणं जास्त महत्त्वाचं वाटतं आहे. यामुळे मी उरलेल्या सामन्यांतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा आर.अश्विनने ट्वीट करुन सांगितली आहे.
I would be taking a break from this years IPL from tomorrow. My family and extended family are putting up a fight against #COVID19 and I want to support them during these tough times. I expect to return to play if things go in the right direction. Thank you @DelhiCapitals 🙏🙏
— Stay home stay safe! Take your vaccine🇮🇳 (@ashwinravi99) April 25, 2021
आयपीएल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर करताना, अश्विनने ट्विट करून असे म्हटलं आहे कि, आयपीएलच्या 14 व्या पर्वामधून मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे उद्यापासून ब्रेक घेतो आहे. माझे कुटुंबीय कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. या कठीण काळात मी माझ्या कुटुंबासमवेत असण मला गरजेच वाटतं. जर पुढील गोष्टी सकारात्मकरीत्या योग्य दिशेने पार पडत गेल्या तर मी दिल्लीसाठी खेळायला परत येईन. आर अश्विनचं कुटुंब सध्या कोरोनाशी लढण्यासाठी प्रयत्न करत आहे, आणि अशा कठीणवेळी अश्विनने कुटुंबाला आधार देण्यासाठी आयपीएल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. अश्विनने आयपीएलच्या 14 व्या मोसमात दिल्लीसाठी 5 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने केवळ 1 विकेट घेतलेली आहे. अशा प्रकारे स्पर्धेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणारा अश्विन हा एकमेव खेळाडू ठरला आहे.
अश्विन यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन्ही संघांसाठी खेळला होता. आताच्या मोसमात तो दिल्लीकडून खेळत आहे. दिल्लीने त्याला 2020 च्या मोसमाच्या अगोदर 7 कोटी 60 लाख रुपये देऊन खरेदी केलं आहे. आर अश्विन दिल्लीचा बिनीचा शिलेदार आहे. केवळ अश्विन संघात असण्याने संघाला मोठा धीर असतो. तो विकेट टेकर फिरकीपटू आहे. अश्विन आतापर्यंत 159 आयपीएल मॅचेस खेळला आहे. त्यामध्ये त्याने 139 विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय त्याच्या नावावर 419 रन्स देखील आहेत.
काल सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सुपर ओव्हर सामना जिंकल्यानंतर अश्विननं आयपीएल मधून माघार घेत असल्याचे ट्वीट केलं आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पुढील सामना 27 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सोबत होणार आहे. त्या सामन्यात आर अश्विन शिवाय दिल्लीला मैदानात उतरावं लागणार आहे. कालच्या विजयानंतर दिल्ली आता यादीमध्ये दुसर्या क्रमांकावर पोहोचली आहे. असं असलं तरी आर अश्विनला झालेल्या चार सामन्यामध्ये एकही बळी मिळवता आलेला नाही.