26 C
Mumbai
Friday, July 19, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeLifestyleजागतिक वाईल्ड लाईफ दिवस

जागतिक वाईल्ड लाईफ दिवस

मनुष्याने प्राण्यांच्या अधिवासात अतिक्रमण केल्याने आजच्या काळात अनेक प्राण्यांचे अधिवास नष्ट झाले आहेत. अनेक प्राण्याची प्रजाती सुद्धा पृथ्वीवरून नष्ट होताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. प्राणी मात्रांबरोबर अनेक विविध प्रकारच्या वनस्पती सुद्धा नष्ट होत असून त्यांचंही संवर्धन करणे आवश्यक आहे. दरवर्षी ३ मार्च रोजी जागतिक वाईल्ड लाईफ दिवस हा साजरा केला जातो. विशेषत: वनस्पती आणि प्राण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पृथ्वीवरील सजीव सृष्टीला आजच्या वातावरण बदलाचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो आहे. त्यातच अद्ययावत विकासाच्या नावाखाली जंगलांची तोड केली जाते आहे.त्यामुळे पृथ्वी वरील सजीवांचे अस्तित्व जर टिकवायचं असेल तर वनस्पती आणि प्राणी जीवनात समतोल राखण अत्यावश्यक आहे.

२०१३ साली संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने दरवर्षी ३ मार्च हा जागतिक वर्ल्ड लाईफ दिवस साजरा करण्याचं ठरवलं. जेणेकरून वन्य जीवांवर असलेला धोका लक्षात घेता त्या माध्यमातून पृथ्वीवरच्या प्राणी आणि वनस्पती जीवनाबद्द्ल जागरुक राहून एकूण समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या मानवामुळे प्राणी आणि वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणात संकटात आल्याचं पहायला मिळतं आहे. त्यामुळे त्याच्या विशेष संवर्धनाची गरज आहे. त्याकरिता CITES या संस्थेची निर्मिती संयुक्त राष्ट्र संघटनेने केली आहे. हा दिवस साजरा करतेवेळी  प्रत्येक वर्षी एक विशेष थीम आयोजित केली जाते. यावर्षीची Forests and Livelihoods: Sustaining People and Planet” अशी जागतिक वाईल्ड लाईफ दिवसाची थीम आहे. पृथ्वीवरील करोडो नागरिकांच्या  विशेषत: स्थानिक लोकांच्या आयुष्यात वन्यजीवांचे आणि वनस्पतींचे काय महत्व आहे हे सांगण्यासाठी या थीमचा वापर करण्यात आला आहे. वन्यजीव संवर्धनाबाबत हेतू लक्षात घेऊनच जंगल, अभयारण्य तसेच माळरानाची समृद्धता वाढवणे, त्यांची संख्या वाढवणे पाऊल उचलले पाहिजे. अत्याधुनिक्कीकरण आणि विकासाच्या नावाखाली जंगल तोडून त्याचे रूपांतर सिमेंटच्या जंगलात करण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे जंगल नष्ट होत असल्याने वन्यजीव जाणार तरी कुठे? ते आपला उदरनिर्वाह तरी कसा करणार? त्यामुळे स्वभविकच  ते आपल मोर्चा मानवी वस्तीकडे वळवत आहेत. विकासाच्या नावाखाली जंगल उजाड करून वन्यजीवांच्या अधिवासावर कधी घाला घातला गेला हे लक्षातच आले नाही. अफाट जंगलतोड केल्यामुळे वने, डोंगर, दऱ्या व रानातील जैव विविधताचं नष्ट झाली. त्यामुळे अन्नसाखळी तुटून गेली. अन्न व पाण्याच्या शोधात भटकंती करत वन्यजीवांकडून अनवधानाने शेत पीक किना पाळीव पशूवर हल्ले होतात आणि स्वसंरक्षणासाठी माणसा कडूनही वन्यजीवांची हत्या केली जाते,  तर कधी वन्यजीव अन्नपाणी न मिळाल्याने तडफडून जीवही सोडतात. समृद्ध वने करण्यासाठी व हि जैव अन्न साखळी टिकवण्यासाठी तसेच जंगलातील मनुष्याचा  वाढता हस्तक्षेप टाळण्यासाठी कडक नियमावली बनविणे अत्यावश्‍यक आहे. भारतात आधुनिकीकरनाच्या नावाखाली दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली जाते. त्यामुळे जंगलतोडी विरोधात आणि जंगल संवर्धन विकासात स्थानिक नागरिकांचा व स्वराज्य संस्थांचा सहभाग असणे गरजेचे आहे. जंगलामध्ये दुर्मिळ त्याप्रमाणे विदेशी झाडे असल्याने या झाडांना फुले,  फळे,  शेंगा येत नसल्याने वन्य जीवांचे अन्न नाहीसे झाले आहे. तसेच जंगलांमध्ये वारंवार लागणाऱ्या वणव्याने अनेक औषधी वनस्पती जळून खाक झाल्या आहेत. भारत हा उष्ण कटीबंधात वातावरणात मोडत असल्याने तीनही ऋतूंचे वैशिष्ट्ये महत्त्वपूर्ण आहे. जानेवारी अखेर उन्हाच्या झळा लागू लागल्याने जंगले व डोंगर, टेकडी माथ्यावरील वाढलेले गवत व इतर लहान झुडपे वाळून जातात आणि एका रांगेत असल्याने अनेक डोंगर रांगाना आगी लागत आहेत यात अनैसर्गिक व नैसर्गिकरीत्या वणवे लागून अनेक जंगले, त्यातील अनेक उपयुक्‍त वनस्पती, औषधी वनस्पती, पशू, पक्षी, कीटक, नष्ट होत चालले असून ते रोखण्यासाठी केवळ वनविभाग जबाबदारी पेलू शकत नाही, सर्वसामान्य लोकांचा सहभागही तितकाच गरजेचा आहे.

- Advertisment -

Most Popular