5G ट्रायलला केंद्र सरकारच्या दूरसंचार विभाग आणि दळणवळण मंत्रालयाने अखेर मंजुरी दिली असून 5G स्पेक्ट्रमचे वाटप ज्यांना करण्यात आलं आहे, त्यांनाच ही मंजुरी मिळाली आहे. या वाटपाशी संबंधित कंपन्या या आठवड्यापासून ट्रायल्स सुरु करण्याच्या तयारीमध्ये आहेत, असे वृत्त समोर आले आहे. भारतामध्ये सध्या ग्राहक संख्या सर्वाधिक असलेल्या खासगी टेलिकॉम कंपन्यामध्ये जसे कि, भारती एअरटेल, काही महिन्यांपूर्वी टाय अप केलेली व्होडाफोन व आयडिया आणि रिलायन्स जिओ ला 5G नेटवर्कसाठी चुरस दिसून येणार आहे. पण, ही ट्रायल किती वेळ घेतली जाईल, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ट्रायलमध्ये चिनी पुरवठादार सहभागी नसतील, हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे टेलिकॉम इक्विपमेंट कंपनी हुवैई ही या ट्रायलमध्ये सहभागी होणार नाही आहे.
भारताने जेव्हा 5G नेटवर्कवर काही अंशी नियंत्रण मिळवले, त्यावेळी ही घोषणा करण्यात आली आहे. भारतात काही महिन्यांपासून 5Gच्या अनुषंगाने हालचाली सुरुही झाल्या आहेत. परंतु, त्यास अधिकृत दुजोरा मिळण्याची आणि 5G परीक्षणासाठी स्पेक्ट्रमचे वाटप होण्याची प्रतिक्षा होती. एक स्वदेशी 5G नेटवर्क विकसित करणार असल्याच्या यापूर्वीच रिलायन्स जिओने स्पष्ट केले होते. याकरिता कंपनी 5G नेटवर्कसाठी आवश्यक असणाऱ्या स्मॉल सेल उपकरणांच्या निर्मितीवर कार्य करत आहे. भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत या अभियाना अंतंर्गत जिओ ही यंत्रणा चीन अथवा कोणत्याही राष्ट्रची कोणत्याही प्रकारची मदत न घेता पूर्णतः मेड इन इंडिया तत्वावर उभारत आहे.
जानेवारीमध्ये भारती एअरटेलने हैद्राबाद येथे कर्मशिअल नेटवर्कवर 5G नेटवर्कची तपासणी यशस्वी झाल्याचा दावा केला होता. तसेच आमची कंपनी 5G नेटवर्कसाठी तयार आहे. आत्ता केवळ सॉफ्टवेअरचे अपडेशन सक्षम करून स्वीच बदलण्यासाठी नियामक मंडळाची मंजूरी मिळणे आवश्यक असल्याचे नमूद केलेले होते. तथापि भारतामध्ये 5G मोबाईल नेटवर्क चाचण्यांसाठी कोणते बॅन्ड कार्यरत असतील हे पाहणे गरजेचे आहे.
भारतात मागील वर्षी अनेक मोबाईल कंपन्यांनी 5G कनेक्टिव्हिटी असलेले अनेक मॉडेल्सची निर्मिती केली आहे. भारतामध्ये देखील मेक इन इंडिया या अभियानातंर्गत भारताला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब निर्माण करण्याच्या तयारीत आहे. डिलाईटने मागील वर्षी आपल्या 5G द कॅटॅलिस्ट टू डिजिटल रेव्ह्युल्युशन इन इंडिया या अहवालात म्हटले होते की, भारतामध्ये 5G नेटवर्क सुरु झाल्यानंतर कारखान्यांना रिअल टाईम पुरवठादार आणि ग्राहकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल. तसेच हे कारखाने अधिक कार्यक्षमतेने काम करण्यास उद्युक्त होतील अशी आशा आहे.
भारत अद्याप 5G नेटवर्कच्या स्पर्धेत विकसित देशांच्या तुलनेत बराच पिछाडीवर आहे. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या नेटवर्क चाचणी पुरवठादार कंपनीच्या आकडेवारीनुसार, 34 देशांमधील 378 शहरांमध्ये 5G नेटवर्कची उपलब्धता होऊ शकते आहे आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्यावेळी साउथ कोरियाने 85 शहरांमध्ये 5G नेटवर्क सुरु केले आहे