देशातील पहिले ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र मुंबईतील दादर येथे कोहिनूर स्क्वेअरच्या पार्किंगमध्ये असणाऱ्या जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगाना रांगेत उभे राहणे अडचणीचे ठरते, कोरोना लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यापूर्वीच या ठिकाणी वाहनासकट नागरिकांची गर्दी झाल्यामुळे लसीकरण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. ड्राईव इन लसीकरणाचा फक्त एकच शुद्ध उद्देश आहे कि, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना या लसीकरण केंद्रावर त्यांच्या कारमध्येच लस देण्यात येणार आहे, त्यामुळे हे देशातील आगळे वेगळे ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र ठरले आहे.
देशात ही पद्धत वापरून पहिलाच प्रयोग करण्यात आल्याने सर्व जेष्ठ नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, याला मुंबईतील दादर विभागातील नागरिकांकडून देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याच वेळा लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना रांगेत उभे राहण्यास फार अडचणीचा सामना करावा लागतो. लसीकरण मोहिमेदरम्यान अशा सर्व नागरिकांना कोणत्याही अडचणींविना लस टोचण्यात यावी याचं निस्वार्थ उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे.
Drive in Vaccination center in Mumbai. Superb initiative in Mumbai. @KTRTRS Sir, can we have similar thing in Hyderabad too. A humble request please 🙏 pic.twitter.com/HyI6MM5nhh
— Gaurav 🇮🇳 (@gshri25) May 5, 2021
सदर केंद्रावर जाऊन लस घेणाऱ्या नागरिकांनी हा उपक्रम अतिशय उपयुक्त आणि स्तुत्य असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया इलेक्ट्रोनिक मिडिया समोर नोंदवली आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते या लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार होते. परंतू, नागरिकांच्या वाहनांची लांबच्या लांब लागलेली रिघ पाहता तेथे उद्घाटनाची वाट न बघता लसी देण्यास सुरुवात करण्यात आली. मुंबईत मागील काही दिवसांपासून 45 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचे लसींच्या अपुर्या पुरावठ्यामुळे लसीकरण स्थगित करण्यात आलेले होते. पण, या मोहिमेमुळे आता मात्र पुन्हा एका नव्या रुपाने लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आलेल्या नागरिकांनी देखील अशीच आणखी दोन- तीन ड्राईव इन केंद्र सुरु करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून गर्दीवर आळा बसेल आणि लसीकरण ही वेगाने होईल.
सर्वच नागरिकांकडे वाहने असतीलचं असे नाही, पण थेट केंद्रावर जाऊन लस घेण्यासोबत वाहनांमधून येणाऱ्या नागरिकांनाही लस देण्याच्या या उपक्रमाचे स्वागत सर्व स्तरांतून करण्यात येत आहे. या लसीकरण केंद्रावर सुरुवातीला नोंदणी कक्ष असून पुढे गेल्यावर नागरिकांना लस मिळत जाणार आहे. आजच्या लसीकरण स्लॉट मध्ये दिवसभरामध्ये 1500 लस उपलब्ध करून दिल्या गेल्या असून, यापुढे या संख्येमध्ये नेमका किती आकड्यांचा फरक जाणवतो, आणि लसीकरणासाठी रोज किती संख्येने लसी उपलब्ध होतात, यावर निगराणी ठेवणे महत्त्वाचे ठरेल.