28 C
Mumbai
Wednesday, October 23, 2024

लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि...

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत....
HomeTech Newsयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत ?

युजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत ?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आजकाल जवळपास सर्वच जण उपलब्ध असतात. सोशल मीडियावर ओळखीच्याप्रमाणे अनेक अनोळखी लॉक सुद्धा असतात. काही वेळेला काही अनोळखी माणसे सुद्धा जन्मोजन्माची चांगले मित्र मैत्रीण बनून रहू शकतात. एखाद्या अनोळखी व्यक्तीला सुद्धा नवीन मित्र म्हणून स्वीकारले जाऊ शकते. नवी मैत्री, नव्या गोष्टी, यासेच अनुभव शेअर करता येतात, अनेक गोष्टींच्या बाबत वेगळ्या प्रकारची माहितीही मिळवता येते. हे सगळ आपण जिवंत असताना, पण कधी असा विचार मनात आला आहे का, की एखाद्या सोशल मीडिया युजरचा अचानक मृत्यू झाला तर मृत्यूनंतर त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सचं काय बर कर असतील.

सोशल मिडीयावर काही साईट विशिष्ट प्रसिद्ध आहेत. सर्हास या साईटवर अनेकजण एकमेकांना भेटतात, फेसबुक हा त्यातीलच एक सोशल प्लॅटफॉर्म आहे, जो जगभरामध्ये सर्वाधिक लोक वापरतात. फेसबुकने मृत्यू झाल्यानंतर युजर्सच्या प्रोफाइल बद्दल काही विशेष नियम बनवले आहेत. एक तर हे अकाउंट कोणी इतर संबंधित चालवणार नसेल तर कायमचं बंद केलं जाऊ शकतं किंवा एक त्या युजर्सची आठवण म्हणूनही ठेवता येण्याची सुविधा फेसबुक ने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी एखाद्या युजर्सच्या मृत्यूनंतर फेसबुक अकाउंट हे अकाउंट रिमेंबर म्हणून जतन करून  ठेवता येऊ शकत. त्यासाठी फेसबुकशी एक लीगल कॉन्ट्रॅक्ट करावं लागेल, ज्यामध्ये युजरच्या मृत्यूनंतर त्याचं अकाउंट कोण वापर करु इच्छित आहे, त्याबद्दल सर्व माहिती द्यावी लागते. त्यानंतर संबंधित व्यक्तीशी फेसबुक एक कॉन्ट्रॅक्ट करून त्यात दिलेल्या सर्व नियमावलीचे पालन करून ते प्रोफाइल वापरायला परवानगी मिळते.

social media account after users death

वेगवेगळ्या सोशल साईटसचे रुल्स आणि रेग्युलेशन वेगवेगळे असतात. यूट्यूबच्या माध्यमातून लाखो-करोडो रुपये कमवणाऱ्यांची संख्या आज जगामध्ये मोठी आहे. जर एखाद्या यूट्यूब अकाउंट होल्डरचा काही कारणाने मृत्यू झाला, तर अशावेळी यूट्यूबला देखील फेसबुक प्रमाणे एक लीगल कॉन्ट्रॅक्ट पाठवावं लागतं, ज्यात मृत्यूनंतर हे अकाउंट कोण हँडल करणार आहे, हे सांगावं लागतं आणि तसे न केल्यास यूट्यूब अकाउंट हँडल न केल गेल्याने ते ठराविक कालावधीनंतर बंद करतो.

सध्या बहु चर्चेत असणारे इन्स्टाग्राम, त्याच्या फेसबुकप्रमाणेच 90 टक्के पॉलिसी आहेत. फेसबुकप्रमाणेच अकाउंट पूर्णपणे बंद केलं जाइल अथवा ते आठवणीच्या स्वरुपातही राखून ठेवता येऊ शकत, फक्त त्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर बाबी पूर्ण करणे आवश्यक आहे.

ट्विटरवर एखाद्याच्या मृत्यूनंतर अकाउंट चालवण्याची कोणतीही पॉलिसी नाही. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एखादा सदस्य अकाउंट डिलीट करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू शकतो. कुटुंबातील सदस्याच्या रिक्वेस्टनंतर पोस्ट, फोटो आणि अकाउंट डिलीट केलं जातं. यासाठी मृत्यू प्रमाणपत्र द्यावं लागतं.

फेसबुकवर अकाउंट तोपर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहतं, जोपर्यंत मृत्यूची सूचना दिली जात नाही. लिंक्डिनवर मृत्यूची माहिती मिळताच अकाउंट बंद होतं. ट्विटर अकाउंट सहा महिन्यानंतर बंद !

- Advertisment -

Most Popular