भारतावर ओढवलेली ही भयंकर परिस्थिती ही केवळ कोरोनाकाळात दाखवलेल्या हलगर्जीपणामुळे. भारताने कोरोना महामारीच्या संकटात जिथे अनेक बलाढ्य राज्य अजुनही पूर्णपणे खबरदारी घेताना दिसत आहेत, तिथे भारताने ही परिस्थिती सांभाळण्यात केलेल्या चुकांतून धडा घेण्याचा सल्ला अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची यांनी तेथील निवडून आलेल्या खासदारांना दिला आहे. आपल्याकडे कोरोना व्हायरसचा संसर्ग संपुष्टात आला असल्याचा गैरसमज करून घेऊन भारताने वेळे आधीच देशामध्ये सर्व व्यवहार आधीसारखे खुले केले. त्यामुळे आज भारत या भयंकर परिस्थितीला समोरा जात आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेमध्ये अनेकांनी आपली जवळची, लांबची माणसे गमावली, कारण तेंव्हा उपचार पद्धती निर्माण केली गेली नव्हती, पण दुसऱ्या लाटेची देशात आलेली तीव्रता एवढी वेगवान आणि भयानक होती कि, या तडाख्यात भारतातील आरोग्य यंत्रणा कमी पडली. लसीकरण मोहिमा सर्वत्र राबविल्या जात आहेत तरीही होणार्या मृत्यूदरामध्ये घट होताना दिसत नाही. अनेक राज्ये रुग्णालये, व्हेटीलेटर बेड, बाधित आरोग्य कर्मचारी, लसीचा तुटवडा, ऑक्सिजनची कमतरता आणि औषधांच्या तुटवड्यासारख्या समस्यांचा सामना करत आहेत.
मंगळवारी झालेल्या कोरोनावर सिनेटच्या आरोग्य, शिक्षण, कामगार तथा पेन्शन समितीपुढील सुनावणी बाबत फाउची सांगतात, बाधित रुग्णसंख्या एवढ्या प्रमाणात वाढूनसुद्धा फक्त कोरोना संपल्याची चुकीची धारणा बनवल्याने भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हे संकट उद्भवले आहे. पहिल्या लाटेनंतर कोरोना संपल्याचे सगळे गृहीत धरून होते. आणि म्हणून वेळेआधीच तिथे सर्व काही पूर्ववत सुरु करण्यात आले. आणि आता त्याचा गंभीर परिणाम डोळ्यासमोर दिसतो आहे. यावरून सिनेटर मुरे म्हणाले, अनुभवावरून माणूस शिकतो, तसेच भारतातील परिस्थिती पाहता, अमेरिकेत जोपर्यंत ही महामारी सर्व ठिकाणी संपुष्टात येणार नाही तोपर्यंत ती पूर्णत: संपल्याचे घोषित केले जाणार नाही आणि हे आपण भारताच्या एकूण हृदयद्रावक स्थितीकडे पाहुन शिकावे.
भारताकडून अमेरिकेने काय धडा घ्यावाअसे तुम्हाला वाटते..! या प्रश्नावर उत्तर देताना डॉ. फाउची म्हणाले, वेळ आणि स्थिती तीच राहत नाही, ती बदलतेच, त्यामुळे कोणत्याही स्थितीला कमी लेखू नये, पण गांभीर्य समजून कृती करावी, हे विशेष महत्त्वाचे. दुसरे म्हणजे, सार्वजनिक आरोग्य सुविधांची उडालेली भंभेरी ही सद्य:स्थिती आहे. भविष्यातील कोणत्याही मोठ्या महामारीचा मुकाबला करण्याची तयारी असावी. आणखी एक महत्वाच म्हणजे जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी प्रयत्नही जागतिक स्तरावर करणे गरजेचे आहेत. फक्त आपल्याच देशापुरता विचार करून चालणार नाही तर इतर देशांनाही वेळेला आधार देणे गरजेचे आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी ही माहिती दिली कि, जर आपण भारत ज्याप्रकारच्या अडचणीमध्ये आहे, त्या परिस्थितीत जेवढ वेगाने लसीकरण करणे शक्य आहे तितक्या वेगाने ते करावे.