28 C
Mumbai
Wednesday, July 6, 2022

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....

मध्य रेल्वे मुंबई भरती २०२२

मध्य रेल्वे मुंबई येथे रिक्त पदांची भरती...
HomeEntertainmentरिलीज आधीच बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा राम-सेतू सिनेमा चर्चेत

रिलीज आधीच बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा राम-सेतू सिनेमा चर्चेत

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार नवीन काही ना काही गोष्टींसाठी कायम चर्चेत असतो. अक्षय कुमार आणि त्याने दिग्दर्शन केलेले सिनेमा कायमच चर्चेचा विषय ठरतात. सिनेमाची पटकथा आणि त्यामध्ये असणार्या सत्य घटनांमुळे त्याचे सिनेमे प्रदर्शित होण्या आधीच चर्चेत असतात. दिवाळीचे औचित्य साधून सिनेप्रेमींसाठी नवीन चित्रपटाचा पहिला लूक जाहीर केला आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्व लोकांना विशेष शुभेच्छा देत आपल्या नवीन चित्रपट बद्द्दल माहिती शेअर केली. इंस्टाग्राम वर राम सेतु  या त्यांच्या आगामी चित्रपटाचा पहिला लूक प्रसिद्ध करताना अक्षय कुमार यांनी लिहिले की, या दिवाळीला, भारत राष्ट्राचे आदर्श आणि महानायक भगवान श्रीरामाची महान स्मृती युगान युगे भारताच्या चेतनांमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी एक असा पूल तयार करण्याची गरज आहे, जो भविष्यातील पिढ्यांना भगवान रामाशी जोडू शकेल आणि यामध्ये आमचा खारीचा वाटा असेल. आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. अशा प्रकारची पोस्ट अक्षय कुमारने केली. त्याचप्रमाणे ‘राम सेतु’ या आगामी चित्रपटा बद्दल त्यांनी अजून थोडी माहिती सांगितली. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करत आहेत. यासोबतच अरुणा भाटिया आणि विक्रम मल्होत्रा ​​या चित्रपटाच्या निर्माते आहेत. यापूर्वी दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांनी अक्षयच्या  ‘मंगल मिशन’  चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.

रामसेतू हा तामिळनाडू आणि भारताच्या दक्षिण पूर्व समुद्र किनारी रामेश्वरम बेट आणि श्रीलंकेच्या उत्तर पश्चिमी समुद्र किनारी मन्नार बेटाच्या मध्ये चुनाखडकावर सेतू आहे. भौगोलिक रचनेनुसार लक्षात येते कि काही काळापूर्वी हा भारत आणि श्रीलंका यांना जोडणारा हा महत्वाचा एक दुवा होता. हा सेतू ३० किलोमीटर लांबीचा आहे. मंदिरातील काही कागदपत्रानुसार रामसेतू संपूर्णपणे समुद्राच्या पाण्यावर होता परंतु सन १४८० मध्ये झालेल्या एका चक्रीवादळामुळे तो पूर्णपणे उध्वस्त झाला. हिंदू ग्रंथानुसार, हिंदू देवता भगवान श्री राम आणि दानवांचा राजा रावण  यांच्यात झालेल्या युद्धाच्या दरम्यान या सेतूची निर्मिती झाल्याची कथा सांगितली जाते.

त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग येथील शिवमुद्रा संग्रहालयाचे संचालक श्री. रोगे यांनी पाण्यावर तरंगणार्या दगडाबद्दल माहिती दिली आहे. समुद्रावर फेर फटका मारताना त्यांना एक माती लागलेला दगड सापडला, तो त्यांनी धुवायला पाण्यात टाकला असता तो पाण्यात तरंगू लागला. त्यांनी तो आपल्या संग्रहालयामध्ये ठेवला आहे. त्यांनी त्यावर नेटवर माहिती घेतली असता पुरातन काळामध्ये श्रीलंकेमध्ये राम-सेतू बांधण्यासाठी अशा प्रकारच्या दगडाचा वापर करण्यात आला असल्याचे त्यांना निष्पन्न झाले. ज्वालामुखीच्या लाव्ह्याचा पाण्याशी संयोग होऊन अशा प्रकारच्या दगडाची निर्मिती होते. याप्रकारचे दगड दक्षिण भारत, श्रीलंका आणि जपान याठिकाणीचं आढळून येतात. अक्षय कुमार यांच्या आगामी सिनेमामध्ये या दगडांचा वापर करण्यात आला आहे.

- Advertisment -

Most Popular