27 C
Mumbai
Monday, August 8, 2022

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....

मध्य रेल्वे मुंबई भरती २०२२

मध्य रेल्वे मुंबई येथे रिक्त पदांची भरती...
HomeLifestyleकोरोना आणि मानसिक स्वास्थ्य !

कोरोना आणि मानसिक स्वास्थ्य !

काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने सगळ्यांना घरातचं राहावे लागत आहे. वर्क फ्रॉम होम लाच सर्वांनी पसंती दिल्याने घरातचं राहून आपापली कामे केल्याने किंवा कोरोन काळात मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकर्या गेल्यामुळे जास्तीत जास्त वेळ घरात असणाऱ्या बऱ्याच लोकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. जगभरात कोरोना व्हायरसने हैदोस घातला आहे. अनेक लोक आपल्या घरातच बंद आहेत. त्यामुळे अनेकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अचानक साध्या बोलण्याचा पण राग येऊन आक्रमक होणे, अचानक खुश होणे, हसणे, बराच वेळ एका ठिकाणी बसून विचार करत बसणे, एकच गोष्ट बर्याच वेळा बोलून दाखवणे, एखादी गोष्ट करायला जाणे आणि कशाला आलो आहोत या गोष्टीचा विसर पडणे, आठवूनही एखादी गोष्ट न आठवणे, बोलताना आत्मविश्वास नसणे, अडखळत बोलणे, वारंवार मोबाईल तपासून पाहणे, मन एका गोष्टीत न लागणे, झोप न येणे, चक्कर येणे, अंगात आळस निर्माण होणे, इत्यादी अनेक प्रकारची चिन्हे हि मानसिक आजाराची लक्षणे या काळात समोर आली आहेत. कोरोना व्हायरसमुळे देश अजूनही बऱ्यापैकी लॉकडाऊनमध्येचं आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अनेकजण अजूनही घरातच आहेत. कालांतराने अनलॉकमुळं काही प्रमाणात कामे, व्यापार, नोकर्या  सुरु झाल्या असल्या तरी अजूनही घरात असणाऱ्या लोकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.

माणसाच्या मेंदूचा आणि शरीराचा अतिशय जवळचा संबंध आहे. शरीरावर झालेल्या परिणामावर उपचार करणे एक वेळ सोप्पे आहे परंतु मनावर झालेल्या परिणामावर उपचार करण्यासाठी खूप कालावधी जाण्याची गरज आहे. घरात राहून वरील गोष्टी केल्याने काही प्रमाणामध्ये मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यावर परिणाम होणे कमी होऊ शकते. जसे कि, दररोज योग्य वेळेत जेवावे, योग्य वेळ झोप घेऊन सकाळी लवकर उठून व्यायाम करावा, एखाद्या आवडीच्या विषयाचं पुस्तक वाचावे, व्यायाम करताना आवडती गाणी ऐकावी, मुख्य म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवावा, असे म्हणतात कि, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच, त्यामुळे जास्त विचार करून स्वताचे मन अस्वस्थ करून घेऊ नका. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत अथवा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवावा, हा कोरोनाचा नैराश्याचा काळही निघून जाऊन पुन्हा आयुष्यात चैतन्य निर्माण होईल असा सकारात्मक विचार करायची आपल्या मनाला सवय लावून घ्यायची. गृहिणींना सुद्धा सर्व घराची धुरा आपल्याच शिरावर आहे असे न समजता कामे पूर्ण करण्यात सहभागी होण्यासाठी लहान मुलांपासून कुटुंबातील वडीलधाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या सहभागास प्रोत्साहन दिले पाहिजे. गृहिणींनी केवळ कामात बुडून न जाताकुटुंबासमवेत वेळ घालवला पाहिजे, स्वतचे छंद जोपासले पाहिजे. शेवटी स्वतचे मनस्वास्थ जपणे हे निव्वळ स्वताच्या हातात असते.

- Advertisment -

Most Popular